बस स्थानकात हविलेले पैशाचे पाकीट मिळाले

36

🔹सहप्रवासी प्रवीण निकम यांची समय सूचकता आली कामी

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.20ऑक्टोबर):-शहादा-नाशिक बस ने प्रवास करणाऱ्या महिला इंदुबाई भैय्या कुवर तिकीट काढण्यासाठी वाहकाला सांगितले असता त्यांच्या लक्षात आले की, आपले पाकीट शहादा बस स्टॅन्ड ला हरवले. त्याबाबत त्यांनी वाहकाला आपबिती सांगितली. बस मध्ये प्रवास करणारे प्रविण निकुम सरबरा.खेतिया यांनी त्यांची व्यथा ऐकली आणि लगेच *नितीन सुदाम कोळीववाहतूक नियंत्रक, शहादा आगार फोन करून झालेल्या प्रकाराविषयी माहिती दिली व पाकीट शोधण्यास सांगितले.

त्याच्या सांगितल्याप्रमाणे नितीन कोळी यांनी इंदुबाई कुवर जेथे बसल्या होत्या तेथे जाऊन शोध घेतला असता पाकीट सापडून आले नाही. मग तेथे बसलेल्या महिलेने सांगितले की, आजींनी पाकीट उचलले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी लगेच पाकीट माझ्या हातात दिले. ज्या बसने इंदुबाई प्रवास करत होत्या. त्या बसमधील सहप्रवासी प्रविण निकुम सर यांना फोन करून पाकीट सापडले असल्याची माहिती दिली. प्रविण निकुम सर यांनी इंदुबाई यांना १०० रुपये देऊन शहादाला पाठवले. त्या बस स्टॅन्ड ला आल्यानंतर त्यांना त्यांच्या पाकीट सोपवण्यात त्यांच्या पाकीट मध्ये असलेले 740 रुपये व चांदीचे दागिने त्यांना सुपूर्द केले.