पार्ङी येथील सांङपाण्याच्या नालिचे पाणी रस्त्यावर

27

🔺ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.20ऑक्टोबर):- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पार्ङी येथील गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे या रस्त्याने पायदळ चालताना त्रास सहन करावा लागत आहे.मागील वर्षभारापासून या रस्त्यावर दररोज पाणी साचत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने सांडपाण्याच्या नाल्या नसल्यामुळे हे पाणी दोन्ही बाजूने मुख्य रस्त्यावर येऊन साचत आहे या बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाची कमालीचे दुर्लक्ष दिसत आहे.

तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात घाण असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे हे दूषित पाणी रस्त्यावर सात असून रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या रस्त्याने दररोज गणेशपुर गाजीपुर जांमबाजार चिखली जमशेटपूर वडगाव पारवा गोरेवाङी या नागरिकांना दररोज ये-जा करावी लागत आहे मागील वर्षभरापासून या घाण पाण्याचा गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सांडपाण्याच्या पक्यानाल्या बांधून हे पाणी नाल्यापर्यंत सोङण्यात यावे अशी मागणी होत आहे