कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान कोरपणा द्वारा आयोजित पोलिसभरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

40

✒️संतोष मडावी(कोरपना प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपणा(दि.20ऑक्टोबर):-येथे मागील काही वर्षापासून युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच समजसेवेच्या कार्यात सतत कार्यशील असणाऱ्या युवा प्रतिष्ठान कोरपणा मार्फत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात हातभार लावण्याच्या उद्देशाने युवा प्रतिष्ठान कडून मोलाची कामगिरी, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पोलिस भरती मार्गदर्शक म्हणून ख्याती असणारे माननीय दिलीप भाऊ मालेकर सर यांनी उद्घाटन केले आणि प्रमुख अतिथि म्हणून लाभलेले माननीय भीमराव पवार सर , मालेकर सर ,वैभव ठाकरे सर, मोहितकर सर ,दिनेश राठोड यांच्या उपस्थितीमधे हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून लाभलेले माननीय भीमराव पवार सर यांनी ग्रामीण भागातील युवकांनी या स्पर्धेच्या युगात आपले विश्व कश्या प्रकारे निर्माण करायला पाहिजेत यावर अतिशय मार्मिक असे मार्गदर्शन केले तर वैभव ठाकरे सर यांनी स्पर्धापरीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन या विषयायवर अगदी समर्पक असे मार्गदर्शन केले याच सोबत माननीय मोहितकर सर आणि सुद्धा मुलांना स्पर्धा परीक्षेबाबत महत्वाच्या सूचना दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मालेकर सर यांनी पोलिस भारतीमध्ये मुलांनी ग्राउंड ची तयारी आणि लेखी परीक्षेत मुलांना येणाऱ्या विविध अडचणी कश्या प्रकारे सोडवून परीक्षेत यशस्वी व्हावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन वैभव सर आणि केले असू प्रास्ताविक अविनाश महल्ले सर आणि मांडले आहे तर आभार प्रदर्शन अमोल लोडे सर यांनी केले .या प्रशिक्षण शिबिराला कोरपणा जिवती गोंडपिपरी, राजुरा, वरोरा तालुक्यातील 250 मुलांनी प्रवेश घेऊन भरभरून प्रतिसाद दिला आहे . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोरपणा येथील तरुण-तरुणींनी आणि युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.