अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनाने गावातीलच वृद्ध व्यक्तीला चिरडले

36

🔺72 वर्षीय वृद्ध व्यक्ती जागीच ठार

🔺ब्रम्हपुरी तालुक्यातील दुखःद घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.21ऑक्टोबर):-आवळगाव येथील अवैध रेती तसकरी च्या वाहनाने गावातीलच वृद्ध व्यक्तीला जोररदार धडक दिल्याने त्या वृद्धाची जागीच मृत्यु झाल्याची दुःखद घटना मंगळवारी (20 ऑक्टोबर )सायंकाळी जवळपास 5.30 वाजता घडली.

मृतक वृद्ध रामचंद्र भिवा चीलबुले (72) हा रा. आवलगाव येथील रहिवासी असून, सदर ट्रॅक्टर चालक रवी वसंत उंदिरावाडे हा नशेत असल्याने त्याचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने रामचंद्र यांच्या अंगावर नेऊन जागीच ठार केले.

व काही जवळ असलेल्या लोकांनी आपला जीव वाचवत स्वतःला अपघाता पासून बचाव केला. या घटनेमुळे सदर गावात रेती तस्करीच्या विरोधात मोठी कारवाही करून अवैध रेती तस्करी वर आळा घालण्यात यावा अशी मागणी गावातील लोकांकडून होत आहे.