नांदेड जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी पन्नास हजार रूपये मदत द्या

31

🔹शिवबा संघटनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ कानोले यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.22आॅक्टोबर):-अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात शेत पीकांची पुर्णपणे नासाडी झाली आहे, हाताशी आलेली पिक नष्ट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकर्यांची आर्थिक बाबतीत दयनीय अवस्था झाली आहे. अशा वेळी आपल्या शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे.

म्हणून आपण तात्काळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतीचे पंचनामे करून ५० हजार रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हाताशी व तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे व शेतातील उभ्या पिकाला मोड फुटल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

त्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे अनेक शेकडो हेक्टर वरील पिके पाण्या मुळे नष्ट झाले आहे, तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस,केळी, ऊस, अन्य अशा पिकांची नुकसान मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे अशी मागणी शिवबा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ गणपतराव पा कानोले शिवबा संघटना यांनी नायगांव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केले.

या मागणीच्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर तसेच गजानन सुरेशराव फुलारी यांच्या सह्या आहेत.