राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान

34

✒️वसुमती देसाई(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.22ऑक्टोबर):-वाशी (ता.करवीर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती, कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांच्या संयोजनातून राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील होते. 

कोरोना काळात महत्वपूर्ण काम केलेबद्दल कोरोना योद्ध्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए, वाय ,पाटील,
जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना योद्ध्यांसह सहकुटुंबाचा सन्मानपत्र, साडी, वह्या देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांचा केक कापून वाढदिवस साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते साळोखे यांचा फेटा, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती, कोल्हापूर ग्रामीणच्या वतीने याप्रसंगी डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक , पत्रकार, पोलीस , ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा ‘ कोरोना योद्ध्या सन्मानपत्र ‘ देऊन सहकुटुंब सन्मान करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील म्हणाले, “कोरोना महामारीच्या काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षितेसाठी बाहेर पडून सर्वांना आधार देण्याचे, जनजागृती करण्याचे, संरक्षण करण्याचे उल्लेखनीय काम कोरोना योद्ध्यांनी केले आहे. असे सांगून त्यांनी अनिल
साळोखे यांच्या कामाचे कौतुक केले.

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कृष्णात पुजारी यांनी हा कार्यक्रम घेतल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी म्हणाले, कोरोना काळात योद्ध्यांनी जोखीम पत्करून विशेष कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा कार्यक्रम असल्याचे सांगून अनिल साळोखे हे पक्षासाठी व कार्यकर्त्यांसाठी करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला.स्वागत व प्रास्ताविक महादेव सणगर यांनी केले.

यावेळी उद्योगपती दत्ता हजारे, शिरीष देसाई, चंद्रकांत संकपाळ, बापूसो पाटील, एकनाथ पाटील, बाळासाहेब देशमुख, महादेव पाटील, इंदर पाटील, करवीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक मेटील, उपाध्यक्ष युवराज पाटील, उत्तम पाटील, साईनाथ पाटील, एस. पी. चौगले, बाजीराव तळेकर प्रकाश पाटील, मच्छिंद्र मगदुम, संदिप पाटील, संजय जाधव, दत्तात्रय उवरी, कल्पेश चौगले, आप्पासो धनवडे यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.