धानोरा तालुक्यात केंद्र सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

24

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.22ऑक्टोबर):-धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरात शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याकरीता शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. विविध ठिकाणी जाऊन शेतकरी विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलेला या विरोधात शेतकऱ्यांसाठी हे तीन काळे कायदे अतिशय घातक असून, शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे.

त्यामध्ये कुठलीही हमी नसून, साठे बाजारांना अधिक फायदा करण्याचा कुटील डाव केंद्र सरकारने रचला आहे. अश्यावेळी साठे बाजारांना अधिक फायदा फोहाचवून शेतकरयांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र रचले गेले आहे.याकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आव्हान केले आहे.

या शेतकरी स्वाक्षरी मोहीमेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री मनोहर पाटील पोरेटी, क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य श्री. विनोद लेनगुरे, माजी सभापती प.स धानोरा चे रामेश्वरी नरोटे, छबिलाल बेसरा, विश्वनाथ मांदाळे, काशिराम नरोटे, माजी सरपंच गेडाम, पवार, संजय गावडे, परमेश्वर गावडे, बाबुराव तुलावी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी मौजा खरगी या गावी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे या बाबत शेतकरयांना सविस्तर माहिती सांगुन शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आला. तसेच विविध ठिकाणी शेतकऱ्यांना भेटून काळे कायदे बद्दल माहिती सांगुन ते काळे कायदे शेतकरयांना अतिशय घातक असून गुलाम बनविण्याचे कायदे आहेत. असे यावेळी सांगण्यात आले.