ग्राम सचिवांचे मनमानी कारभाराचे विरोधात उपोषण करणार

30

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.22ऑक्टोबर):-जवळच्या काचणगाव येथील ग्राम सचिवांच्या मनमानी कारभारा विरोधात सरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केलेली असुन कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा ईशारा दिला आहे.
काचणगाव येथे मागील पाच वर्षापासुन कु.आर.एन.मुजबैले ह्या सचिव म्हणुन कार्यरत आहेत.तसेच येथे मागील दोन वर्षापासुन तानबाजी तळवेकर हे सरपंच आहेत.

ग्राम सचिवांच्या असहकारा बाबत सरपंच तळवेकर,उप सरपंच व चार सदस्यांनी हिंगणघाट पं.स.चे गट विकास अधिकार्‍यांना दिनांक १४ सप्टेबर रोजी निवेदन देउन चौकशी करण्याची मागणी केली.या निवेदनानुसार ग्राम सचिव ह्या सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.तसेच आतापर्यंत झालेल्या कोणत्याही कामाचा हिशेब सादर करण्यात आलेला नाही.

ग्रा.पं.सदस्यांनी सुचविलेली कामे रेकार्ड मध्ये घेतल्यावर ही केल्या जात नाही,प्रोसिडिंग दाखवल्या जात नाही,ठराव व सर्व्हे होउन सुद्धा सीसी टिव्ही लावण्यास टाळाटाळ करणे,ग्रा.पं.चे कॅशबुक व एम.बी.अद्यापपर्यंत न दाखविणे तसेच मुख्यालयी हजर नसणे व फोन न उचलने या ग्राम सचिवां विरुद्धच्या तक्रारींचा पाढा निवेदनात वाचण्यात आला.

परंतु अद्याप पर्यंत गट विकास कधिकार्‍यांनी या निवेदनावर कोणतीच कार्यवाही न केल्याने दि.१९ आक्टोबरला सरपंच व सदस्यांनी गट विकास अधिकार्‍यांना दुसरे निवेदन देवुन ग्राम सचिवांचा मनमानी कारभार न रोखल्या गेल्यास हिंगणघाट पंचायत समिती समोर उपोषण मांडण्यात येईल असा ईशारा दिलेला आहे.