आमदार ॲड लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत जातेगाव- गेवराइ -सेलु मारफळा रस्त्यासाठी डि. पी. आर. तयार करुन रस्ता पाहणी

26

🔸आमदार लक्ष्मणराव पवार यांनी जातेगाव सर्कल मधुन दर्जेदार रस्ता डांबरीसाठी भरीव निधी आणला खेचुन

✒️गोपाल भैया चव्हाण(विशेष प्रतिनिधी)मो:-9665667764

गेवराई(दि.22ऑक्टोबर):-तालुक्यातील जातेगाव येथे प्रत्यक्ष कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या उपस्थितीत चकलांबा – गेवराई – जातेगाव – राष्ट्रीय महामार्ग २२२ या ६४ किलोमीटर रस्त्याचा डिपीआर तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. आमदार लक्ष्मण पवार , अधिकारी व संबंधीत एजन्सीचे प्रतिनिधी यांनी जातेगाव सेलु मारफळा या रस्त्याची पाहणी करून रस्ता करण्यासाठी आराखडा तयार करण्यास सुरुवात करण्यात आले आहे.

गेवराई तालुक्यातील चकलांबा – गेवराई – जातेगाव या जवळपास ६४ किलोमीटर रस्त्याची मोठी समस्या आहे. या रस्त्यावरील सोळा पुलाची उंची कमी असल्याने जाणारा – येणारांना मोठ्या अडचणी ला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कित्येकदा पुलावरून पाणी जात असल्याने चार – चार तास वाहतूक ठप्प राहते. या सर्व बाबीचे गांभीर्य ओळखून आमदार लक्ष्मण पवार यांनी चकलांबा – पौळाचीवाडी – खळेगाव – देवपिंपरी – राजपिंपरी – गेवराई – केकतपांगरी – रोहितळ – जातेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग २२२ जवळपास ६४ किलोमीटर रस्त्याच्या कामाला हाब्रिड अँनव्हिटी योजने अंतर्गत मंजुरी मिळाली आहे.

या कामासाठी १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्ता कामाचा डिपीआर तयार करण्याची जबाबदारी मध्यप्रदेशातील एका एजन्सी ला शासनाने दिली आहे. या एजन्सीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. या रस्त्याच्या निर्मिती मुळे पांढरवाडी, राजपिंपरी, देवपिंपरी, माटेगाव, पौळाचीवाडी, रोहितळ अशा जवळपास सोळा पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

बुधवार रोजी दु 1 वा जातेगाव सेलु मारफळा रस्त्यावर आमदार लक्ष्मण पवार साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सय्यद, भाजपा युवा नेते तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण , प्रल्हाद येळापूरे,संदिपान दादा चव्हाण,कल्याण वाघमारे,भरत दादा चव्हाण, जालींदर राठोड,गोरख राठोड, श्रीकृष्ण बापु चव्हाण, भास्करराव चव्हाण, माऊली चव्हाण, आरबड, सेहेल शेख, अभयसिंह पांढरे, प्रदिप चव्हाण,आदी सह एजन्सीचे प्रतिनिधी व कर्मचारी यांनी संयुक्त रस्त्याची पाहणी केली आहे.