हु.पानसरे यांची पुण्यतिथी साजरी व मुक्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन संपन्न

    41

    ✒️अशोक हाके(बिलोली प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.23ऑक्टोबर):-तालुक्यातील अर्जापुर येथील हु. पानसरे महाविद्यालयात व स्मारक येथे गोविंदराव पानसरे यांची पुण्यतिथी दि.२१ आँक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्सासकेंद्राच्या इमारतीचे उदघाटन संपन्न झाले.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव देशपांडे तर उदघाटक म्हणून मुक्त विद्यापीठ नांदेड विभागीय सल्लागार डॉ.बी.के.मोहन,डॉ. मुधोळकर हे होते.प्रमुख उपस्थिती सचिव सुनील बेजगमवार, माजी आ.गंगाधरराव पटने,राजेश्वरराव उत्तरवार,गंगाधरराव सब्बनवार,सुभाष गायकवाड, प्रदिप अंबेकर, श्रीनिवास जिठ्ठावार, संजय दमकोंडावार, साईनाथ दाचावार, नरेश सब्बनवार,डॉ. प्रशांत सब्बनवार,पत्रकार कुणाल पवारे,सरपंच तुळसाबाई सुंकलोड,प्राचार्य अशोक श्रीरामे आदींची उपस्थिती होती.

    कार्यक्रमाच्या सुरूवातीस हु.गोविंदराव पानसरे स्मारक येथे सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.त्यानंतर हु.पानसरे यांच्या पुतळ्याला सचिव सुनिल बेजगमवार यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले.त्यानंतर माजी आ.गंगाधरराव पटने,डॉ. बी.के.मोहन, डॉ. मुधोळकर,प्राचार्य डॉ. अशोक श्रीरामे,केंद्रप्रमुख प्रा.डॉ. आर.जे.गायकवाड,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप मनोहरराव देशपांडे यांनी तर सुत्रसंचालन प्रा.डॉ. गोपाळ चौधरी व आभारप्रदर्शन प्रा.जी.पी.बैलके यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.