इगतपुरी नगरपरिषदेच्या मार्फत दिव्यांग बांधवांन सहाय्यता निधी वाटप

69

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

नाशिक(दि.24ऑक्टोबर):-इगतपुरी नगरपरिषदेच्या वतीने सन 2020-21 आर्थिक वर्षातील दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के तरतुदीनुसार रुपये 16 लाख 84 हजार निधी 175 दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला कोरोना संसर्ग महामारी च्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन झाल्यामुळे व्यवसाय बंद असल्याने दिव्यांग व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बिकट व हलाखीची झाल्याने दिव्यांग बांधवांच्या मागणीनुसार स्वरोजगार करता रोख स्वरूपात निधी देण्यात यावा.

याप्रमाणे मे कौन्सिलने त्वरित निर्णय घेऊन निधी वाटप करण्याचे ठरवले इगतपुरी नगर परिषद च्या प्रांगणात निधीचे वितरण मुख्याधिकारी श्रीमती निर्मला गायकवाड/पेखळे यांच्या हस्ते करण्यात आले, सर्व लाभार्थ्यांना निधी थेट बँकेत खात्यावर जमा होईल.या निधीचा यशस्वी करता सन्माननीय लोकप्रिय नगराध्यक्ष श्री संजय इंदुलकर व उपनगराध्यक्ष नईम खान तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक नगरपालिका अधिकारी श्री सतीश जोशी सर, श्री प्रवीण जाधव, सहाय्यक अधिकारी संजय कळंबे व दिव्यांग प्रतिनिधी संतोष मानकर आदींचे मोलाचे सहकार्य मिळाले.

या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने संतोष मानकर योगेश चव्हाण, नंदू आरोटे, नितीन गव्हाणे, सोपान परदेशी, वैशाली कर्डक, नंदू आरोटे, पवन रूपवते, शंकर सदगीर, अनिल शिंदे, लता मनोहर, इत्यादी उपस्थित होते.