महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग! त्रिमूर्ती कडून पाने पुसण्याचा प्रयत्न सुरू

56

🔸रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

बीड(दि.24ऑक्टोबर):-रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शेतकरी सह विविध घटकातील शेवटच्या गोरगरीब जनतेसाठी संघटनेची बांधणी करण्यासाठी शाखा प्रमुख,गणप्रमुख,गटप्रमुख, तालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा प्रमुख अश्या सर्व आघाड्या चे पदाधिकारी निवडण्यात येणार असून सर्व तालुका व जिल्हास्तरावर आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी केलेल्या कामाची चौकशी करून आढावा तयार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात येत आहे.

तसेच राज्यातील कोरोना महामारित सगळे राजकीय पक्ष राज्यात व केंद्रात सत्तेत असून बियाणे, खते, औषधी,राशन,निराधार, आत्महत्या ग्रस्त कुटुंब, रुग्णाची हेळसांड, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, सर्व मंडळ अधिकारी कार्यालय,नगरपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती,तहसील, भूमी अभिलेख, सर्व बँका जिल्हा स्तरावरील सर्व विभागातील अधिकारी व कार्यालय अतिशय शेवटच्या माणसापर्यंत मदत करणे गरजेचे असल्याचे सोडून सामान्य माणसाला लुटण्याचा गोरज धंदा करत गाव समर्थक ते सर्व पदाधिकारी राजकीय नेते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

यात शंका असण्याचे कारण नाही शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी कुणीही ठोस पावले उचलली नाहीत तर उलट सर्वच शेतकरी परतीच्या पावसाने उध्वस्त झाला तर सगळेच गायब झालेले नेते वार पलटवार सोडता काहीच दिवे लावले नाहीत उलट राज्याच्या तिजोरीवर दौरे पे दौरा या नाटकात बोजा करण्याचा व राज्यातील जनतेचा दिशाभूल करत घोर फसवणूक केली असा रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील आमचा आरोप असून शेतकरी बांधवांचे राजकारण करण्याचे सोडून राज्यातील सर्व नेत्यांनी राज्याची हेक्टरी मदत जाहीर करावी.

केंद्रातील नेत्यांनी हेक्टरी मदत जाहीर करावी अशी अपेक्षा राज्यातील बळीराजाला आहे असे हजारो शेतकरी रयत शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी यांचेकडे मागणी करण्यात येत असून लवकरच राज्यातील व केंद्रातील सर्व नेत्यांनी मदत शेतकरी बांधवांना जागवण्यासाठी सोडून अनेक नेत्यांची दौरे काढून स्वतः प्रसिद्धी घेण्यासाठी चढाओढ लागलेली राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे हे लक्षात ठेवा राज्यातील शेतकरी विविध घटकातील शेतकरी,युवक,विध्यार्थी,वंचित,शोषित,पिढीत,रोजगार,कामगार,निराधार, दीव्यांग,विकल, विविध पिढीत रुग्ण, विविध समाजाचे राजकारण आरक्षण, विविध प्रवर्गातील अनेक प्रश्न उपस्थित आहेत.

हे केवळ नाममात्र राज्यकर्ते निवडणुकी पूर्वी सर्व अठवणारे वेळी हातात झेंडे देणारे नेत्यांनी स्वार्थासाठी पक्ष,पार्टी बदलणाऱ्या सर्वच पार्टीला जनतेने झेंडे सोडून हातात दांडे घेण्याची वेळ आली आहे खाली जात,झेंडा, धर्म, गट, टत व गुत्तेदार,दलाल, चले, चपाटे सोडले तर बाकी सगळे थोतांड असून यांना ज्या जनतेने निवडून दिले डोक्याला टेगुळ येऊसतर पाय पडून झालेले राज्यातील कीती नेते या कोरोना काळात आपल्या मतदासंघातील जनतेपर्यंत मदत, सर्व शासकीय योजना पोहचविण्यासाठी कटिबध्द होते.

राज्यातील कुठल्याही मतदार संघातील नेत्याने अजी माजी आमदार,मंत्री, माजी मंत्री, भावी आमदार, भावी मंत्री जाहीरपणे सांगावे उलट कॉन्ट्रॅक्टर व सगळ्या गुत्तेदार समर्थक, सत्तेत नसणारे सत्तेत सहभागी होत सगळे चोरावर मोर झाल्यासारखे वाटत असून रयत शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सुनील नानासाहेब ठोसर पाटील जाहीर जनता दरबारात येण्यास तयार आहे राज्यातील विविध योजनांची अंमलबजावणी तत्काळ कारवाई करण्यात येणार असून वेळ आली.

तर तिथेच सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील लवकरच जिल्हास्तरीय समिती स्थापन करून विविध मागण्यासाठी संबधित सर्व सदस्य, कार्यालयात येऊन आमच्या गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुणालाही कुठेही मन मोकळे दिसत नाही राज्यातील विविध भागात विविध नेत्यांनी निवडणूक आली असल्यागत सारखे वागत डोंगर पोखरून उंदीर काढल्या सारखी मदत जाहिर केले आहे थोडीतरी शेतकरी बांधवांना मदत होईल असा निर्णय घेतला असता तर शेतकरी बांधवांना चांगली मदत करून सरकारने खरेच पाठीशी असल्याचे दिसून आले असते.

ही फक्त जखमेवर मीठ चोळत दिशाभूल करणारे निर्णय सरकार व राज्य सरकार मधील सर्व मंत्री मंडळ बळीराजाची थट्टा करत आहे दौरे काढून आशेवर ठेवले असून लवकरच रूमणे घेऊन माय माऊली सह बळीराजा आपल्या प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे सरकार मायबाप योग्य मदत देता की खुर्चीवरून पाय उतार होता हा प्रश्न निर्माण झाला आहे आपण मोठाले दौरे काढून बळीराजाला फसविले हे राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आपले सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून गोरगरीब जनतेला वेठीस धरणे बंद करा नसता महाराष्ट्रात कुठेही राजकीय नेत्याला पाय ठेऊ देणार नाही.

असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे नेते प्रदेश सरचिटणीस सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे हे अतिशय वाईट वाटते स्वातंत्र्याच्या पासून आजपर्यंत जनतेच्या विकासासाठी नसून निवडणुकीच्या तोंडावर बोबड्या बोलीत व मायबाप जनतेला फसवतात राज्यातील कष्ट करणाऱ्या जनतेला योग्य मदत होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते दिशाभूल करणारे लोक समोर आली तर रमण्याणें राज्यात सापडतील ते थोकल्याशीवय राहणार नाही.

हा विचार करून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात आम्ही निघणार आहोत गाव पातळीवर ते जिल्हा पातळीवरील आमचा कार्यकर्ता रूमने घेऊन आल्याशिवाय राहणार नाही तसेच पुढील कार्यक्रम राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत राहील असे आवाहन प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य वतीने करण्यात येणार आहे यात शंका असण्याचे कारण नाही यापुढे कुठल्याही राजकीय पक्ष नेते यांची गाठ माझ्या राज्यातील कष्ट करी रोजगार कामगार निराधार शेतकरी मायबाप जनतेशी आहे हे विसरू नये असे आवाहन प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले.