कोरोना काळातील दिव्यांग मीटर धारकाचे लाईट बिल माफ करा

30

🔸अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल- साईनाथ बोईनवाड यांचा इशारा

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.24ऑक्टोबर):-रोजी उपविभागीय अभियंता विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्र राज्य नायगाव यांना लेखी निवेदन देऊन या निवेदनात असे म्हटले की, 22 मार्च 2020 पासून महाराष्ट्र शासनाने लोक डाऊन केले होते त्या नियमाचे दिव्यांग आणि तंतोतंत पालन केले.

पण रीडिंग नोंद करणारे कर्मचारी प्रत्यक्ष मीटर वरील रीडिंग न घेता परस्पर अंदाजे रीडिंग घेत असल्यामुळे मीटर धारकांना जास्तीचे बिल येत असून कोरोना काळातील दिव्यांग कुटुंबातील मीटर धारकाचे वीज बिल माफ करावे अन्यथा प्रहार दिव्यांग संघटना नायगाव ही प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनावर साईनाथ बोईनवाड नायगाव ता अध्यक्ष, मारुती मंगरुळे जिल्हा सचिव नांदेड, चांदु आंबटवाड कुंटूर जिल्हा सहसचिव नांदेड, प्रहार दिव्यांग संघटना नांदेड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.