धानोरा तालुक्यात”आमचा गाव-आमचा विकास” आराखडा प्रशिक्षण

33

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.24ऑक्टोबर):-पंचायत समिती धानोरा अंतर्गत पेंढरी गट्टा जिल्हा परिषद क्षेत्रात आमचं गाव आमचा विकास प्रत्यक्ष कृतिशील आराखडा प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद भाऊ लेनगुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास भाऊ दुल्लमवार, प स सदस्य रोशनी पवार, प.स सदस्य मैनाबाई कोवाची, माजी सरपंच अरुण भाऊ शेडमाके, संजय भाऊ गावडे, प्रमुख मार्गदर्शक गटविकास अधिकारी निमसरकार, विस्तार अधिकारी जुवारे उपस्थित होते.

कार्यक्रमाला परिसरातील आजी माजी सरपंच, ग्रामसेवक, वनरक्षक, कृषि सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष गावात शिवारफेरी काढून विविध ठिकाणी भेटी देऊन कृतिशील आराखडा तयार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनोद भाऊ लेनगुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास भाऊ दुल्लमवार आमचं गाव आमचा विकास प्रत्यक्ष कृतिशील आराखडा बद्दल मार्गदर्शन केले.