एसबीआय च्या नुतन शाखाधिका-याकडून पीककर्जाला गती

    35

    ?ञुटी यादीतील शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावे

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.24ऑक्टोबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील भारतीय स्टेट बँकेत मंगेश सोनुले यांनी शाखाधिकारी पदाची सुत्रे घेताच गत महिनाभरात जवळपास २०० पीककर्जांच्या फाईल्स मंजूर करीत पीककर्ज प्रकरणे मंजुरीला गती दिली असल्याने ग्राहकांत समाधान व्यक्त होत आहे.
    येथील भारतीय स्टेट बँकेला शहर व परिसरातील १२ गावे जोडली आहेत. येथील तत्कालीन शाखाधिकारी शेख मस्तान यांची दोन महिन्यापुर्वी बदली झाल्यानंतर शाखाधिकारी पद रिक्तच होते.त्यामुळे ग्राहकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.पीककर्जाची अनेक प्रकरणे प्रलंबित होती.

    त्यातच मध्यतंरीच्या काळात कोरोनामुळे बँक काही दिवस बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बँकेत नुतन शाखाधिकारी नियुक्तीसाठी पत्रकार कुणाल पवारे यांनी पाठपुरावा केला.अखेर गत महिन्यात संंभाजीनगर येथून मंगेश सोनुले हे येथे रूजू झाले.रूजू झाल्यानंतर पहिल्या दिवशी शेळगाव(थडी )येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने पीककर्ज फाईल दोन महिन्यापासून मंजूर झाली नाही. मी दररोज चकरा मारत आहे.

    तिकीटासाठी सुद्धा पैसे नाहीत. अशी कैफियत मांडताच तात्काळ दुस-या दिवशी पीककर्ज मंजुर करत त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून आपल्या कामाची चुनुक दाखवली.त्यानंतर सध्या बँकेत पीककर्ज प्रकरणाला प्राधान्य देत जवळपास २०० प्रकरणे मंजूर करण्यात आली.

    ग्राहकांना कोणताही त्रास न होता त्यांची कामे वेळेवर करण्याकडे विशेष लक्ष असुन पीककर्ज मंजुरी साठी ७० वर्षावरील शेतक-यांची नावे त्रुटी यादीत असुन अशा शेतकऱ्यांनी वारसदार अथवा मुलाचे आधारकार्ड, बँक पासबुक व इतर कागदपत्रे घेऊन बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन शाखाधिकारी मंगेश सोनुले यांनी केले आहे.