राष्ट्रीय किसान मोर्चा पुसद द्वारे तहसीलदार पुसद यांना विविध मागण्याचे निवेदन

35

🔸एकाच दिवशी महाराष्ट्रातील सर्व तहसीलदारांना दिले निवेदन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.25ऑक्टोबर):- येथे (दि.23 आक्टो) राष्ट्रीय किसान मोर्चा पुसद द्वारे मा. तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020 काढणीपश्‍चात नुकसान जोखीम संदर्भात मा. आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार तात्काळ कारवाई करून तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचा सरसगट पीक विमा संरक्षित रक्कम द्या, तालुकास्तरावर प्रधानमंत्री पिक विमा कंपनीचे कार्यालय सुरू करा.

राष्ट्रीय आपत्ती समजून केंद्र व राज्य शासनाकडून एनडीआरएफ फंडातून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये सरसगट मदत द्या, नोंदणीकृत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देऊन केंद्र शासनाच्या निकषानुसार तात्काळ कर्ज वाटप करा, हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे आदी विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. वरील मागण्या संदर्भात शासन व प्रशासन स्तरावर सात दिवसाचे आत यथोचित कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव आपले कार्यालयासमोर संवैधानिक मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तहसीलदारांना एकाच दिवशी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना गणपत गव्हाळे, लक्ष्मण कांबळे, सुभाष धुळेधुळे,अयुबखान तहसिन, राजेश ढोले, बिंबिसार पाईकराव, महेंद्र इंगोले, प्रल्हाद सवंगडे, मधुकर खिल्लारे, भीमराव कांबळे, संतोष पानपट्टे विठ्ठल कुरकुटे आदी राष्ट्रीय किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.