रिपाई आठवले गटाच्या वतीने पोलीस कर्मचारी गुलाब सोनार यांचा नागरी सत्कार

32

🔹नाशिक शहर पोलीस महाराष्ट्रत सर्वात गतीशील व दक्ष – महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25ऑक्टोबर):- आज शनिवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  आठवले उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने नाशिक शहर क्राईम ब्रांच पोलीस कर्मचारी गुलाबराव सोनार यांनी सुट्टीवर असतांना देखील मोठ्या शिताफिने शहरात धुडगूस घालणाऱ्या सराईत चोरांना पकडून आपले कर्तव्य बजावले त्या मुळे त्याचा व त्याच्या सौभाग्यवती ज्योती सोनार यांचा आज यथोचित सत्कार करून सन्मान केला..कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र रणरागिणी व नाशिक जिल्हाप्रमुख महिला आघाडी सौ.गुंफाताई भद्रगे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे हे होते.कार्यक्रमास श्री सुनील मेंदने सर आरपीआय महिला आघाडी नेत्या व पोलीस आयुक्त शांतता समिती सदस्या सौ.सविताताई अनिलभाई गांगुर्डे श्री संदीपभाऊ केदारे लताताई शेळके सुनीता सदावर्ते सखूताई विणकर संजीवनी वाकले सविता वाहुले रेखा शेळके आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन विक्रांत गांगुर्डे यांनी केले.