वस्त्रहरण नाटकाची ज्येष्ठ अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे मुंबईत निधन

58

✒️विजय कांबळे(पैठण प्रतिनिधी)मो:-8454021607

मालवण(दि.25ऑक्टोबर):-तालुक्यातील रेवंडी गावच्या स्नुषा तथा प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री सौ. गीतांजली लवराज कांबळी (वय – ५८) यांचे मुलुंड म्हाडा कॉलनी निवासस्थानी शुक्रवारी पहाटे निधन झाले. गेली आठ वर्षे त्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या.

वस्त्रहरण नाटकातील प्रसिद्ध कलाकार लवराज कांबळी यांच्या पत्नी होत. सही रे सही नाटकात अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. झी वाहिनी वरील कुंकू ही त्यांची मालिका खूप गाजली होती.

बकुळा नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला आणि लैला, गलगले निघाले या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकातही त्यांनी साकारलेली भूमिका दाद देऊन गेली. गीतांजली यांनी ५० पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे.