ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी अडीच महिने होऊन अटक नाही

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.25ऑक्टोबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद वसाहत गंगाखेड याठिकाणी नगरपरिषदेचा जाग्यावर उभारण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची पाटी व निळा झेंडा काढुन टाकल्याच्या कारणावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात आरती ब्रम्हणकर व इतर सहकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत दि.४ अॉगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल असून देखील अडीच महिने उलटून गेले तरीपण आरोपीस अद्यापही अटक केले नाही.

गंगाखेड येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद वसाहत याठिकाणी स्थानिक समाज बांधवांच्या वतीने नगरपरिषद जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह ची पाटी व निळा झेंडा लावण्यात आला होता. परंतु 1 जुलै 2020 रोजी हा निळा झेंडा व पाटी उकडून टाकल्यामुळे. आरती ब्रम्हनाथकर व तीचे साथीदार यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात दि.४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तपास अधिकारी बलराज लांजिले यांनी या प्रकरणातील एकाही आरोपीस अद्याप अटक केलेली नाही. आरोपीस अटक करा या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी बहुजन समाज पार्टी यांनी एकदिवशी धरणे आंदोलन व शेख राजू यांनी तब्बल सात दिवस गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करून देखील जर आरोपी अटक होत नसेल तर कोणता मार्ग अवलंबावा असा प्रश्न आता फिर्यादीच्या वतीने उपस्थित केला जात आहे.वारंवार निवेदन देऊन ही कसल्याच प्रकारे या निवेदनाची दखल घेतली जात नाही.

त्यामुळे पुन्हा दिनांक 22 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक परभणी यांना निवेदन देण्यात आले आहे अॉट्रासिटी प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करावे याच प्रकरणातील 353 अंतर्गत जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते तात्काळ मागे घ्यावे. तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.

या मागणीचे निवेदन दि.२२ अॉक्टोबर रोजी देण्यात आली आहे. याची तात्काळ दखल न घेतल्यास परभणी जिल्ह्यात महाराष्ट्रभर जन आंदोलन करण्याचा इशारा भदंत मुदितानंद थेरो, नगरसेवक सत्यपाल साळवे, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, गुणवंत कांबळे ,देवराव जंगले यांनी दिला आहे.