सिद्धांत अशोक हनवते यानी आय आय टी परिक्षेत झाला उत्तीर्ण

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.25ऑक्टोबर):-भारतातील अतिशय कठीण परीक्षेतील एक परिक्षा म्हणजे आय आय टी ची परिक्षा. अभियांत्रिकी क्षेञातील अतिशय मानाची व सन्मानाची परिक्षा.अशा ह्या महत्वाच्या परिक्षेत गंगाखेड येथील सिद्धांत हनवतेनी यश संपादन करून आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली आहे .आता त्याची निवड कॉम्प्यूटर सायन्स ह्या शाखेत प्रसिद्ध अशा आय आय टी तिरूपती (आंध्र प्रदेश) ठिकाणी झाली आहे.

सिद्धांत गंगाखेड येथील जनरल प्रॅक्टीसनर डाॅ. अशोक व डाॅ प्रतिभा हनवते यांचे चिरंजीव आहेत. ह्यापूर्वीही त्याने मॅथ आॅलिंपियाड, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत यश संपादन केले आहे. गंगाखेड येथील गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल मधून त्याने सातवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

आपल्या यशाचे श्रेय त्याने शिक्षक,आई वडील, आजी आजोबा, काकू, आत्या, मामा मामी, भाऊ बहीण व मित्र परिवाराला दिले आहे.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आपणासाठी प्रेरणादायी आहे असे तो मानतो. त्याच्या ह्या यशाबद्दल त्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.