श्री सेवागिरी महाराज रथ जिर्णोद्धारासाठी श्री मुगुटराव जाधव व श्री चंद्रकांत जाधव यांच्याकडून ११ लाख ७५ हजार रुपयांची देणगी

33

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.25ऑक्टोबर):-संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटक,येथील भाविकांचे आराध्य दैवत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील प.पू. श्री सेवागिरी महाराजांचा रथ नव्याने बांधण्याचे काम सुरू असून श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट ने भाविक भक्तांना रथ जीर्णोद्धारासाठी देणगी देण्याचे आवाहन केले होते.

या आव्हानास प्रतिसाद देऊन माजी प्राचार्य श्री मुगुटराव राजाराम जाधव सर श्री बाळासाहेब मुगुटराव जाधव आणि श्री चंद्रकांत शंकर जाधव, श्री प्रदीप शंकर जाधव व जाधव कुटुंबियांच्या वतीने सदरच्या कामासाठी ११ लाख ७५ हजार रुपयांची देणगी श्री चरणी अर्पण केली.

याबद्दल देवस्थान ट्रस्ट च्या वतीने मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज , चेअरमन श्री मोहनराव जाधव विश्वस्त डॉ सुरेश जाधव, श्री योगेश देशमुख, श्री प्रताप जाधव, श्री सुरेशशेठ जाधव श्री रणधीरशेठ जाधव यांच्या शुभहस्ते स्तकार करण्यात आला. यावेळी जाधव कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.