शाहीन भाभी हकीम व बबलू भैय्या हकीम फेमच्या चर्चासत्रात सहभागी

50

🔹औरंगाबाद येथे खासदार फोजिया खान यांची भेट

🔸अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक दर्जा व सामाजिक सुधारणा यासाठी चर्चासत्राचे आयोजन

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी:- येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निरीक्षक शाहीन भाभी हकीम आणि वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैय्या हकीम 24 ऑक्टोंबर शनिवार रोजी औरंगाबाद येथे फेडरेशन ऑफ माईन्यारीटी एज्युकेशन ऑर्गनाईजेशन अर्थात ‘फेम’च्या चर्चासत्रात सहभागी झाले.

अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक दर्जा सुधारणाचे मूळ उद्देश ठेऊन राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फोजिया खान व त्यांचे पती डॉ. तहसीन खान ‘फेम’ चालवीत असून पहिल्यांदाच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातून शाहीन भाभी हकीम व बबलू भैय्या हकीम यांनी प्रतिनिधित्व करून चर्चासत्रात सहभागी होऊन या भागातील अल्पसंख्यांक समाजाचे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि प्रामुख्याने विविध क्षेत्रात युवक व युवतींना प्रोत्साहन मिळावे याकडे लक्ष वेधले.

तसेच पूर्व विदर्भात ‘फेम’चे विस्तार करून मागासल्या जिल्ह्याकडे लक्ष घालण्याचे विनवणी यावेळी शाहीन भाभी हकीम यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यातून शाहीन भाभी हकीम व बबलू भैय्या हकीम चर्चासत्रात सहभागी झाल्याने दस्तुरखुद्द खासदार फोजिया खान यांनी हकीम दांम्पत्यांचे अभिनंदन व आभार मानून खास गडचिरोली जिल्ह्याकडे लवकरच दौऱ्यासाठी येणार असल्याचे यावेळी खासदार फोजिया खान यांनी शब्द दिले.