श्रावस्ती बुद्ध विहार,चार्वाक वन येथे धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.26ऑक्टोबर):-तालुक्यातील श्रावस्ती बुद्ध विहार चार्वाक वन येथे चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी व ६४ धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम टी.बी.कानिंदे यांचे अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे डी.जी.गोस्वामी,आणि अॕड.अप्पाराव मैंद यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे पूजन करून व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ,म.फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून महामानवांना अभिवादन केले.

व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.
प्रास्ताविक अॕड.अप्पाराव मैंद यांनी केले. तर प्रमुख पाहुणे डी.जी.गोस्वामी आणि यशवंतराव देशमुख यांनी समयोचित मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपानंतर शैलेश दळवी यांचा दिव्यांग कलाकाराचा गायनाचा कार्यक्रम झाला.संजय आसोले यांनी आभार प्रदर्शन केले,