आमदार संतोषराव बांगर यांच्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त कोथळज येथे नागरी सत्कार

30

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.27ऑक्टोबर):-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील कोथळज येथील नागरिकांकडून आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कोथळज येथे नागरी सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर साहेब यांनी कोथळज येथील जनता जनार्दन मायबाप जनतेचे भरभरून मतदान रुपी प्रेम दिल्याबद्दल शतशः आभार मानले व आपले हे प्रेम सदैव असेच माझ्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त केली.

व गावातील बजरंग बली हनुमान मंदिराच्या विकासासाठी आमदार निधीतून दहा लक्ष रुपयांचा निधी देण्याचे सांगितले.यावेळी सोबत जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुगे सरपंच रमेश जायभाय काशिनाथ घुगे मानकरी पंढरीनाथ घुगे गजानन घुगे अनिल घुगे तानाजी जायभाय मंगेश दराडे प्रकाश दराडे दादाराव सोळुंके बाळू घुगे मनोज घुगे त्र्यंबक घुगे पाटील विश्वनाथ गीते यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी मंडळी शिवसेना व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.