वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे स्थलांतर व नुतन वास्तु शुभारंभ कार्यक्रम संपन्न

92

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.26ऑक्टोबर):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील सोसायटीच्या प्रांगणात गेली अनेक वर्ष भाड्याने असलेल्या वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कार्यालयाचे स्थंलातर व नुतन वास्तुचा शुभारंभ कार्यक्रम आज २५ आँक्टोबर रोजी ३३ के.व्ही.सबस्टेशन कुंडलवाडी (चेनापुर) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.या कार्यक्रमासाठी महावितरणचे देगलूर विभागाचे धर्माबाद चे उपविभागीय अभियंता सुमीतकुमार पांडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी सहाय्यक अभियंता पी.व्ही.काळे,कनिष्ठ अभियंता सुजय निकम, शेख जुबेर,सागर मोहरकर,अभियंता राजु शिंदे,पत्रकार गणेश कत्रुवार,अशोक हाके,कुणाल पवारे,कल्याण गायकवाड, महमद अफजल,संतोष चव्हाण, अमरनाथ कांबळे,राजु लाभशेटवार,आदी जण उपस्थित होते.

यावेळी सुमीतकुमार पांडे,गणेश कत्रुवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रधान तंत्रज्ञ व्हि.एन.गुडले,पी.पी.रापतवार,ए.के.उशलवार,एल.के.श्रीरामे,बी.एम.तळणे,आर.एल.तेलकेश्वर,डी.एन.देवनपल्ले,एस.आर.संगेवार,जी.बी.गवळी,वाय.एस.शेरीयाल संदीप सुरकुटलावार यांनी परिश्रम घेतले. आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुणाल पवारे यांनी केले.