मांजरा धरणाचे कार्यालय धरणावर आणा अन्यथा धरणावर फिरकू देणार नाही:-राहुल खोडसे

42

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.27ऑक्टोबर):-दि २६ रोजी केज तालुक्यातील मांजरा धरणाचे कार्यालय धरणावर करा अन्यथा धरणावर येणे विसरा आशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.केज तालुक्यातील मांजरा धरण हे बीड,उस्मानाबाद सह लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारे एकमेव धरण असून या धरणाचे उद्घाटन 1980 मध्ये झालेले असून याची साठवण क्षमता 8 tmc आहे.

संबंधित धरणाच्या निर्मिती वेळी धरणाचे मुख्य उद्दिष्ट सिंचनासाठी केलेले होते कालांतराने दुष्काळ आणि कमी पाऊसकाळ होत चालल्याने धरणावर सिंचन कमी आणि लातूर जिल्ह्याला पिण्यासाठी जास्त होत आहे.

या धरणाच्या निर्मिती झाली तेव्हा धरणाचे मुख्य कार्यालय धरणावरच होते परंतु काही राजकिय हेतूने येथील कार्यालय लातूर येथे हलवण्यात आले त्यामुळे ज्या बीड जिल्ह्यातील 70% व उस्मानाबाद जिल्ह्यातील 30% शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आशा शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा.धरण उशाला कोरड घश्याला अशी अवस्था झाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना कुठलाही कागद काढायचा झाला तर त्या शेतकऱ्यांना लातूर येथील कार्यालयात जावे लागत असून तेथील अधिकारी देखिल काम करत नाहीत.

वरतून आर्थिक लूट होत असून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर धनेगाव धरणाचे मुख्य कार्यालय हे धरणावर आणावे अशी विनंती संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आणि हे कार्यालय बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत नसेल तर धरणाकडे बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी धरणाकडे फिरकायचे देखिल नाही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, सचिव विलास गुंठाळ, तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, अमर घाडगे,नायगाव चे सरपंच विवेक खोडसे, धनेगाव सरपंच सुहास गुजर,दिलीप पाटील,विलास खोडसे, हर्षवर्धन खोडसे, अक्षय खोडसे,संदीप चौरे,सुजय पकवे,अशोक गुजर,सुधाकर खोडसे, नितीन खोडसे,दत्ता मुळे, रवींद्र खोडसे,नितीन गुजर,दयानंद गुजर,संतोष ढवळे, रामेश्वर गुजर आदींच्या स्वाक्षरी आहेत.