केंद्र सरकारच्या विरोधात धानोरा तालुक्यात जनजागृती

72

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

गडचिरोली(दि.27ऑक्टोबर):-भाजप सरकार लादत असलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ तालुका कॉंग्रेस कमिटी धानोरा च्यावतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री मनोहर पाटील पोरेटी व जिल्हा परिषवद सदस्य श्री विनोद लेनगुरे यांच्या नेतृत्वात रांगी – येरकड या क्षेत्रातील नवरगाव, रांगी, मोहली, चिंगली महावडा, निमगाव, जेवलवाही, यागावी जाऊन येथे जनजागृती व स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

यावेळी मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, विनोद भाऊ लेनगुरे सदस्य जिल्हा परिषद, माजी सभापति कल्पना वड्डे मॅडम, नवरगाव सरपंच कपिल कोवा, माजी सरपंच नामदेव नरोटे, मिचगाव सरपंच सौ ज्योत्स्ना कोवे, माजी उपसरपंच प्रमोद कोवेजी, निमगाव चे जगन्नाथ जी राजगडे, रांगीचे राजु भाऊ भोयर, जेहलवाही सरपंच राजीराम जी हलामी, नामदेव तोफा, संजय गावडे व शेतकरी उपस्थित होते.