मनूवाद्यां विरुद्ध छेडलेले युद्ध असलेला ‘उतरंड’ चित्रपट अखेर प्रदर्शित

28

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.29ऑक्टोबर):-१४ ऑक्टोबर १९५६ रोजी जगातली दुसरी क्रांतीकारी घटना घडली. ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना शोषितांना दिलेली बौद्ध धम्माची दिक्षा! आणि वरून आधीच बाबासाहेबांनी संविधाना च्या रूपाने आमच्या साठी मोकळा करून दिलेला सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग आम्हाला झपाट्याने बदलून गेला. आज आमच्यातला 20 टक्का वर्ग इथल्या प्रस्थापितांशी बरोबरी करू लागला. सर्व पदे भूषवू लागला.

सगळी क्षेत्रे काबीज करू लागला. परंतु चित्रपट क्षेत्रात हवी तशी फळी आंबेडकरी समाज निर्माण करू शकला नाही. या मागे अनेक कारणे आहेत. त्या मध्ये जातीयवाद, हे एक प्रमुख कारण आहेच. शिवाय या क्षेत्रात येण्या साठी लागणारे महागडे शिक्षण, योग्य मार्गदर्शन, आर्थिक गणित, कौटूंबिक प्रोत्साहनाची उणीव , या क्षेत्रातली अनिश्चितता, आणि वर काही नैतिकतेच्या बऱ्या वाईट अफवा यामुळे आंबेडकरी समाज या क्षेत्रात मागेच राहिला.

पण या सर्व गोष्टींवर मात करून सुदाम रघुनाथ वाघमारे यांनी या क्षेत्रात आपला ठसा उंमटवलाच. त्यांचा बहुचर्चित चित्रपट उतरंड 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून. आज पर्यंत साडे चार लाख लोकां पर्यंत तो अनेक मार्गानी पोहोचला ही खूप मोठी गोष्ट आहे.खात्या पित्या घरच्या सधन माणसांनी बनवलेल्या 100 सिनेमांच्या तुलनेत सर्वच बाजूंनी पिडलेल्या एका व्यक्तीचा एकच सिनेमा पुरून उरेल अशी ही धडाडी आहे. मोठी गरुडझेप आहे असे म्हणावे लागेल. थायलंड अमेरिका जपान इंग्लंड या देशातील लोक देखील चित्रपटाची मागणी करताहेत हे विशेष.

लाखो रुपयांचे ऍडव्हान्स बुकिंग झालेले आहे. आणि प्रत्येक तासाला नवीन लोक समाविष्ट होतं आहेत.हा चित्रपट खैरलांजी पासून ते हाथरस पर्यंत आणि आता काल परवा घडलेल्या महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँग रेपचं महाभयंकर चित्र मांडतो आणि या घनघोर अत्याचारा विरोधात आवाज देखील उठवतो.प्रत्येक १८मिनिटाला या देशात जातीय द्वेषातून एका स्त्रीवर बलात्कार होतो आणि ४५ मिनिटाला एक हत्या, गेल्या वर्षात सरकारी आकडे वारीनुसार ३५००० बलात्कारांची नोंद झाली आणि २३ हजार हत्या झाल्या.. परंतु ज्या अत्याचारांची नोंदच झाली नाही किंवा पोलिसांनी दखलच घेतली नाही अशां घटना किती पटीने अधिक असतील याची कल्पनाच न केलेली बरी. कारण भारत हा जातीभ्रष्ट देश बनला आहे.

गेल्या सहा वर्षा पासून तर अधिकच.या देशातील विषमता वादी संस्कृती आणि एका विशिष्ट समाजाला आणि स्त्रीला दिलेला इथल्या धर्माने दिलेला गुलामीचा दर्जा यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो मेंदू चेतवतो, आणि आवाज उठविण्यास प्रवृत्त करतो …
असा हा चित्रपट धम्मक्रांती दिनी प्रदर्शित होणे आणि तो देखील चक्क बुद्ध विहारात ही एक क्रांतिकारीच घटना आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुदाम वाघमारेंनी केले असून निर्मिती भूषण बोराडे यांची आहे.

काल वाशिंद येथे धम्मराजिक विपश्यना सेंटर येथे जागतिक भिख्खुसंघाच्या उपस्थितीत आणि अनेक सामाजिक संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्याच्या साक्षीने बुद्धविहारातच प्रीमियर शो पार पडला. बाबासाहेब म्हणत की बुध्दविहार ही देशाची क्रांती केंद्र बनली पाहिजेत. तेव्हा इतिहासाने नोंद ठेवावी अशी ही घटना आहे.सर्व राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि भिक्कू संघाच्या 11 भदंतांनी सुदाम वाघमारे आणि निर्माते भूषण बोराडे यांचा सत्कार केला. बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याला माल्यार्पण करून एक पायी फेरी काढली.

आणि मग विहारात भिख्खु संघाला उतरंड टीम च्या वतीने चिवर प्रदान करण्यात आले.अशा प्रकारे चित्रपटाचा प्रकाशन सोहळा होणे ही जगातली पहिलीच घटना आहे. कारण प्रीमियर म्हटले की नाच गाणे अन दारूच्या मटणाच्या पार्ट्या,असा वर्षानुवर्षांचा रीती रिवाजच या सिनेमाने मोडून काढला ही खूप मोठी क्रांतिकारी घटना असल्याचे अनेक उपस्थित पत्रकारांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले.या चित्रपटात नाशिक पुणे औरंगाबाद नागपूर येथिल शेकडो कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे सुदाम वाघमारेंनी भैय्यालाल ची अत्यंत कठीण भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट फक्त आठ दिवस दिसणार असून चित्रपट. ज्यांना हा चित्रपट बघावयाचा असल्यास त्यांनी aim2 चे सभासद बनने आवश्यक आहे. असे निर्माते भूषण बोराडे यांनी सांगितले
अधिक माहितीसाठी9820208028 अथवा 9833777250 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनकीर्ती संध्या. पी आर ओ, कडून करण्यात आले आहे