कांदा साठवणूक निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे वांदे

31

🔹स्वा.री.प. चे जगताप यांचे मत

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी):-9960227439

नाशिक(दि.29ऑक्टोबर):-आशिया खं डातील कांदा उत्पादनाबाबत सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवला लासलगाव व पिंपळगाव बसवंत ही सर्वात मोठी बाजारपेठ होय एकीकडे कोरोना चा कहर तर दुसरीकडे पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाबरोबरच त्यापाठोपाठ लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती बरोबरच आर्थिक संकटात व आपत्तीत सापडल्याने हतबल झाल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने काही अटी शर्ती ठेवून कांदा साठवणुकीवर निर्बंधआणल्याने कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बेमुदत बंद ठेवून आडमुठे धोरण अवलंब केल्याचे दिसून येते.

यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा आज रोजी विकायला आणला असता काही दिवसावर येऊन ठेवलेला दिवाळीचा सण शेतकऱ्याला रडवणार की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे शेतकऱ्याचे दोन्ही बाजूने मरण होत आहे.प्रशासनाने घेतलेले निर्णय अथवा व्यापार्‍यांनी घेतलेले निर्णय शेतकरीविरोधी असल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप यांनी म्हटले आहे.