राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रत्नाकर गुट्टे यांची निवड

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31ऑक्टोबर):-राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची प्रदेशाध्यक्ष निवड करण्यात आली आहे ही निवडणूक माजी मंत्री तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर व राष्ट्रीय अध्यक्ष श्री अक्कीसागर साहेब यांच्या मार्गदर्शन पार पडली गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी उभी केली.

असून त्यांना पक्षवाढीसाठी याची मदत होईल पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले आहे या निवडीमुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.