शेतकऱ्यांना मदत आणि तालुक्यातील रस्त्यांसाठी निधी द्या

36

🔸गंगाखेड कॉंग्रेसचे बांधकाममंत्र्यांना साकडे

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31ऑक्टोबर):-अतीवृष्टीतून वगळण्यात आलेल्या गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी. तालुक्यातील अंतर्गत रस्ते, शहरातील वळण आणि डिपी रस्ते यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आज गंगाखेड तालुका कॉंग्रेसच्या वतीने राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोकराव चव्हाण यांचेकडे करण्यात आली.

राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पहिल्यांदाच परभणीत आलेल्या अशोकराव चव्हाण यांनी आज कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, सुशांत चौधरी, नगरसेवक प्रमोद मस्के यांनी तालुका आणि शहरातील विविध समस्या श्री चव्हाण यांच्यासमोर मांडल्या. जिल्हाध्यक्ष, आ. सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, तुकाराम रेंगे पाटील, युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. प्रेरणाताई वरपुडकर आदिंसह जिल्हाभरातील वरीष्ठ पदाधिकारी-नेते यावेळी ऊपस्थित होते.

गंगाखेड तालुक्यास न मिळालेले २०१८-१९ मधील न मिळालेले अनुदान देण्यात यावे, अतीवृष्टीचा निकष गृहीत न धरता शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, रस्ता क्रमांक ३५७ के हा परभणीपर्यंतच घेण्यात आला आहे. तो गंगाखेड-सुपा-पिंपळदरी-किनगाव मार्गे सुरू करण्यात यावा, तालुक्यातील दुरावस्था झालेले रस्ते आणि शहरातील डीपी व वळण रस्त्यांसाठी ५० कोटी रूपयांच्या नाधीची तरतूद करावी अशी मागणी यावेळी अशोकराव चव्हाण यांचेकडे करण्यात आली.

या मागण्यांच्या पुर्ततेसाठी सकारात्मकपणे विचार करण्याची ग्वाही यावेळी शिष्टमंडळास त्यांनी दिली. गोविंद यादव, शेख युनूस, सुशांत चौधरी, प्रमोद मस्के, साहेबराव चौधरी, सिद्धार्थ भालेराव, योगेश फड, अजय कदम, संजय सोनटक्के, नागेश डमरे, ओम शिंगणे आदिंसह तालुक्यातील पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहीती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे.