फलटण येथील दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

31

🔹मानवाधिकार संरक्षण समिती सातारा जिल्हा यांनी सादर केले आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.31ऑक्टोबर):-पुरागामी महाराष्र्टात सातारा जिल्हातील फलटण तालुक्यात उपळवे येथील अल्पवयीन मुलीचा दि.३ आॅक्टोंबर रोजी समाजातील काही राक्षसवृत्तीच्या माणसांकडून अत्याचार करून सदर मृतदेह गावाजवळील ७ ते ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्तालगतच्या विहीरीमध्ये टाकुन देण्यात आला होता.

मृतदेह संशयास्पद होता. मृतदेहाच्या कमरेला दगड बांधले होते. तरीही स्थानिक पोलीस प्रशासनाने आत्महत्या असल्याचा शिक्का ठोकला आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिडीत कुंटुबाने वारंवार विनंती करूनही एफआयआर ची काॅपी आणि पोस्टमार्टमची काॅपी दिली नाही.

पिडीत कुटुंबाने वारंवार सांगुनही आरोपींवर हत्येची कलमे लावली नाहीत. या सर्व हालचालींवरून पोलीसांचे कामकाज संथ व संशयास्पद वाटत असुन, तक्रार न घेणारया संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी तसेच पिडीत कुटुंब हे मागासवर्गीय असल्याने तपासात कसुर होत असुन ही आत्महत्या नसुन हत्या आहे.

याचे पुरावे गोळा करून आरोपीची लाय डिटेक्टीव चाचणी, नार्को टेस्ट, पोलीग्राम चाचणी कराव्यात आणि सदर खटला फास्ट ट्रॅक वरती चालवावा अशी मागणी मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे महाराष्र्ट राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या उपस्थितीत सातारा जि. जनसंपर्क अधिकारी अशोकराव हारे, सातारा जि. संघटक  महादेव कणसे,फलटण ता. अध्यक्ष श्री. रविंद्र अहिवळे, फलटण ता. उपाध्यक्ष श्री. योगेश गाढवे व अन्य सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी फलटण तालुका नायब तहसिलदार श्री. आर सी पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.