दोन अधिकाऱ्याच्या अंतर्गत कलहामुळे तीन कर्मचाऱ्याच्या तडकाफडकी बदली

    37

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.31ऑक्टोबर):-गंगाखेड पोलीस ठाण्यात कर्तव्यात असणाऱ्या तीन कर्मचाऱ्याच्या तडकाफडकी बदलीचे आदेश पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी गुरुवारी सायंकाळी काढले यात सय्यद उमर सय्यद अमीन, मुक्तार खान रतन खान, राजेश रमेशराव मस्के या तिन्ही कर्मचाऱ्यंच्या बदल्या परभणी मुख्यालयात केल्याचे आदेश काढले आहेत.

    गंगाखेड पोलिस कार्यक्षेत्रात दोन अधिकाऱ्याच्या वादात तीन कर्मचारी बळी गेल्याची गंगाखेड शहरात जनतेची चर्चा होत आहे डि.वाय.एस. पी.व पोलीस निरीक्षक यांच्या वादात कर्मचाऱ्यांना सजा मिळते. अशी चर्चा होत आहे. हे आदेश गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या 27 ऑक्टोंबर गोपनीय अहवालावरून कडण्यात आले आहे असे आदेशात म्हटले आहे पोलीस निरीक्षक व डी,वाय.एस.पी. असा वाद अनेक वेळा उफाळून आला आहे.

    तसेच गंगाखेड पोलीस निरीक्षकाच्या कर्तव्य कसूर च्या 14 गोपनीय अहवाल तात्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक  यांना पाठव न्यात आले होते. परंतु पोलीस निरीक्षक याना अभय देत पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधातील गोपनीय अहवाल मात्र ताबडतोब कार्यवाही होऊन तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. जर डि.वाय.एस.पी. व पोलीस निरीक्षक यांच्या अंतर्गत कलाहमुळे बदलीची वेळ येत आहे का? आशी चर्चा आता जनतेत होत आहे.