सरकार व नेत्यांची नियत खराब असून नुसत्या गप्पाचा पाऊस

86

🔹तत्काळ भरपाई द्या? शेतकरी राजाचे राजकारण करून मंत्री झाले ते गप्प का?

🔸प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांचा खरखरीत सवाल

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.31ऑक्टोबर):-राज्यातील शेतकरी बळीराजा आज अतिशय वाईट परस्थितीशी संघरषात्मक जीवन जगत असून आज सर्वत्र सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालं ! सर्व महाराष्ट्र राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी, बड्या राजकीय नेत्यांच्या बड्या उद्योगांना,कंपन्यांना, काही बड्या कर्ज बुडणाऱ्या अनेकांना लाखो कोटी रुपयांची रक्कम माफ करताना जनाची नाही तर मनाची तरी थोडी शिल्लक ठेवली होती असे वाटत नाही! असा प्रश्न राज्यातील अनेक शेतकरी विविध भागातील शेतकरी आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या मार्फत मागणी करण्यात येत असून राज्यातील शेतकरी बंधूची आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे सरकार वर ३०२ चा गुन्हा नोंद झाला पाहिजे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आज गप्प का बसले! हे सगळे शेतकऱ्यांना स्मरणात आहे आपण पोकळ दौरे करून शेतकरी बांधवांना आशेवर का ठेवले विरोधी पक्ष नेते म्हणून राज्यात दौरा करून आमच्यासाठी काय केलं! असा राज्यातील शेतकरी बांधवांना प्रश्न निर्माण झाला आहे आपण केलेली एक लाख कर्जमाफी! आपण लावलेले निकष! आपण केलेली दिशाभूल आजही राज्यातील शेतकरी बळीराजा विसरलेला नसून चाळीस वर्षांपूर्वी शेतकरी बांधवांना दिलेले छोटे पीककर्ज आजही बाकीच असून असे हजारो लोक राज्यातील विविध भागातील शेतकरी आपल्या पीककर्ज माफ कोण करणार असा प्रश्न पडतो?

यासाठी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष स्थापन झाल्यापासून काहीही दिवे लावले नाहीत उलट शेतकऱ्यांना स्मरणात राहील अशी कायम हेळसांड सतत गोरगरिबांच्या नशिबी आणले जाते यात शंका नाही राज्यातील त्रिमूर्ती सरकार मोठमोठे दौरे काढून, मोठमोठ्या भूलथापा देऊन, सरकार शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही सरकार खंबीर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भरीव मदत करणार राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना अतिवृष्टी पॅकेज हे तुटपुंजी मदत जाहीर करून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सरकारने निराशा केली आहे असा दावा राज्यातील अनेक शेतकरी करत आहेत सरकार खंबीर सगळ्या पक्ष प्रमुख,पार्टी, छोटे घटक म्हणून शेतकरी प्रश्नावर बोलता बोलता मंत्री झाले असून सर्व नेते, मंत्री, आजच्या गंभीर परस्थिती मध्ये मूग गिळून आपल्या खात्याचा मलिदा सावरण्यात गुंतल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना गाय रान धारकांना दिवाळी पूर्वी हेक्टरी मदत व सरसकट पीकविमा मिळाला नाही तर सरकार मधील सर्व मंत्री महोदय यांचे घरावर दिवाळं मोर्चा रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व हजारो शेतकरी बांधवांना सोबत घेऊन प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सुनील नानासाहेब ठोसर पाटील मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत सांगितले आहे.