राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाणमपल्ली येथील जनतेचा मेगा पक्ष प्रवेश

34

✒️विजय तोकला (सिरोंचा प्रतिनिधी)मो:-9403477377

सिरोंचा(दि.1नोव्हेंबर):-अहेरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्षनेते माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेबांचा मार्गदर्शनाखाली तसेच महिलांचे आदर्श नेते,गोरगरिबांचे कैवारी,माजी जिल्हापरिषद अध्यक्षा,रा.युवती कांग्रेस जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)यांच्या सूचनेनुसार सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष सौ.मनीषा रवी चल्लावार,रा.युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवा येनगंदुला यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक 1/11/2020 ला जाणमपल्ली येथील महिलांनि व पुरुषांच्या मेगा पक्ष प्रवेश तसेच रा.का.पक्ष महिला कोषाध्यक्ष म्हणून ललित तिरुपती सोदारी यांची नियुक्ती करण्यात आले आहेत.

पक्षावर विश्वास व पक्षनेतृत्व विकास कामांवर आधारित पक्ष प्रवेश घेतले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला तालुका अध्यक्ष सौ.मनीषा रवी चल्लावार यांनी पक्ष बडकठी घरोघरी व गावागावात पक्षाचे उद्दिष्ट व पक्षाचे विकासकामे आणि पक्षनेतृत्व मा.धर्मरावबाबा आत्राम साहेबांनी केलेल्या.

विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना सांगितले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात ताकदीने असल्याने व रा.का.पक्षाचे सर्व्हेसर्व कृषिरत्न मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचारधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम महिला अध्यक्ष करीत असल्याचे दिसून येते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नारायण सोदारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.