महाविर नगर येथे बुद्ध मूर्तीची स्थापना

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.1नोव्हेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांच्या अंतर्गत महिला शाखा महावीरनगर व पारमिता महिला मंडळ महावीरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानीय बुद्ध विहार येथे आश्विन पौर्णिमाचे औचित्य साधून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष व मार्गदर्शक रवीजी भगत यांनी त्रिशरण, पंचशील घेतले. आणि ५ बालकांनी गाथा घेतली .व त्यानंतर ५ महिलांच्या हस्ते बुद्धमूर्तीचे अनावरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर नगर शाखाध्यक्षा शांताबाई मंडाले. ह्या होत्या.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ॲड .अप्पाराव मैंद, जि.प.सदस्य भोलेनाथ कांबळे, प .स.सदस्य देवेंद्रजी खडसे , भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, गोवर्धन मोहिते ,रमेश उमाटे, ॲड किसन कोठुळे, गोविंदराव कांबळे, विष्णू सरकटे, मारोतराव शेंडे, बौद्धाचार्य प्रचार व पर्यटन जिल्हासचिव भगवान बरडे, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, महागाव बौद्धाचार्य किशोर आळणे, सुभाष दायमा ,प्रभा भोयर ,रेखा जवादे, अनुप भोयर हे प्रमुख पाहुणे म्हणून इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद खडसे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा महाविर नगर व पारमिता महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी महिला शाखा शिवाजी वार्ड , सुभाष वार्ड, महावीर नगर ,गांधीनगर, सुदर्शन नगर, येथील महिला शाखेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच उपासक-उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम चौरे यांनी केले.तर आभार ल.पु.कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता सरणतयगाथेने करण्यात आली.