अवैद्य गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफिया वर पडल्या धाडी 

    41

    ?७,७३५१०रुपयेचा माल जप्त

    ?पोलीस उपविभागीय पथकासह स्थानीक गुन्हे विभागाची कारवाई

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.2नोव्हेंबर):- शहरात गेल्या अनेक महिन्यापासुन सर्रासपणे अवैद्य गुटखा विक्री होत होती,गुटखा विक्री करणाराची टोळीच शहरात सक्रीय झाली होती.दि.३१ आँक्टोंबरच्या रात्री ७ ते ११.५० पर्यंत जैदीपुरा,गुलजार काँलनी अदिसह ठिकाणी परभणीच्या स्थानीक गुन्हे अन्वयेषक पथकाने व पोलीस उपविभागीय पथकाने शहरात धाडी टाकत शहरात ७ लाख ७३ हजार ५१० रुपायाचा गुटखा जप्त करून तीन आरोपीस अटक केली व एक आरोपी फरार झाला, या तीन आरोपीस न्यायालया समोर उभे केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    या बाबत अधिक माहिती अशी की,शहरामध्ये शासनाची गुटखा बंदी असतांना प्रशासकिय अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने लाखो.रुपायाचा गुटखा साठा करून खुलेआम विक्री होत होती,शहरातुन गुटखा इतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जात होता.परभणीचे पोलीस अधिक्षक जयंत मिना या़च्या आदेशावरुन परभणी स्थानीक गून्हे अन्वयेषन शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे या़नी परभणी जिल्हात अवैद्य धंद्या विरोधात मोहिम उघडली आहे.

    स्थानीक शाखेचे मोरे यांच्या पथकाने व उपविभागीय अधिकारी बलराज लांजीरे यांच्या पथकाने दि.३१ आँक्टोंबरच्या रात्री ७:३० वा.गुप्त माहितीद्वारे शहरातील जैदीपुरा,गुलजार काँलनी येथे  गुटख्याचा साठा करुन ठेवणाऱ्या आरोपी कर्मांक ०१ च्या घरी रुपये १,६९,७३५ माल जप्त करण्यात आला असून आरोपी कर्मांक ०२ च्या घरातून रुपये ५०३६२० जप्त करण्यात आला तर आरोपी कर्मांक ०४ च्या घरातून रुपये १००१५५ माल जप्त करण्यात आला आहे.

    या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत रुपये ७ लाख ७३ हजार ५१० रुपायाचा साठा जप्त करुन तीन आरोपीस अटक केली व एक आरोपी मात्र पसार झाला.या पोलीसांच्या गुटखा विरोधी धडक कारवाईमुळे गुटखा व्यापाऱ्यात एकच खळखळ उडाली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी पथकातील पोलीस काँ. निलेश दिगांबर भुजबळ या़च्या फिर्यादीवरुन आरोपी नदीमखान मोईजखान रा.जैंदीपुरा,आखेफखान उस्मान खान गुलझार काँलनी ,आरेफखान उस्मान खान,मैनोद्दीन खान रा.गुलजार काँलनी,शेख हकीम शे.नशीयोद्दीन रा.गुलजार.काँलनी या आरोपी विरुध्द गुन्हा र.नं.४७६/२० कलम ३२८,२७२,२७८,१८८,३४ भादवी प्रमाणे गून्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास गंगाखेड पोलीस स्टेशनचे फौजदार विठ्ठल घोगरे हे करीत आहेत.

    या गुटखा विरोधी महत्वपुर्ण कामगीरी मध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी बलराज ल़ाजीरे,स्थानीक गुन्हे अन्वये शाखेचे प्रविण मोरे,सपोनि आलेवार,पो.काँ.केंद्रे,जमोरोद्दीन फारुकी,गायकवाड,मोबीन,उपविभागीतील कर्मचारी पुजारी,मपोना,मुंढे,एस.टी.मदरगे,एम.बी वाघ,ख़दारे या पथकाने हि यशस्वीरीत्या कामगीरी राबवुन आरोपीस अटक केली.तीन आरोपीस १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.सदर कारवाईमुळे आवैद्य धंद्या कर्णाराचे धाबे दणाणले आहेत.