शेतकरी संघटनेचे राजेश कवठे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

28

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.2नोव्हेंबर):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या उपस्थितीत आणि अरूण वासलवार यांच्या पुढाकाराने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राजेश कवठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजेश कवठे हे याआधी शेतकरी संघटनेत कार्यरत होते. पक्ष बळकटीकरणासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल असा विश्वास राजेंद्र वैद्य यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बाबासाहेबजी वासाडे, उल्हासजी करपे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका निरीक्षक गोंडपीपरी श्री.मानकर जी, राजुरा विधानसभा युवक अध्यक्ष श्री.कुणाल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल श्री.पुरुषोत्तम वाघ उर्फ वाघ मामा,जिल्हा सचिव ऍड.मंगेश काळे ,तालुका उपाध्यक्ष श्री.बाबुराव बोंडे, युवक तालुका उपाध्यक्ष श्री.जयेश कारपेनवार, सोशल मीडिया सेल तालुका अध्यक्ष श्री.आशिष मुंजनकर,धाबा शाखा सर्कल अध्यक्ष श्री.विलास पामुलवार तसेच माजी तालुका अध्यक्ष श्री.मनोज धानोरकर इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.