धाराशिव साखर कारखाना युनिट 3 येथे प्रथम पाच साखर पोत्याचे हमाल कामगारांच्य हस्ते पूजन

    43

    ✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.2नोव्हेंबर):-ज्या हमालाच्या पाठीवरती ओझं दिलं जातं, त्यांना हा मान देण्यात आला. लहानातल्या लहान गोष्टीपासून मिळणारा आनंद वेगळाच असतो. कारखानामध्ये काम करणारा हा प्रत्येकजण कुटुंबातील एक घटक आहे.कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे. भागातील शेतकऱ्यांचा ऊस आणल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. यंदा गळीत हंगाम मोठा असून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.

    पुढच्या वर्षीही उसाचे प्रमाण आणखीच वाढणार आहे. त्यामुळे आपल्या नोंदी कारखान्यास देऊन सहकार्य करावे. कारखाना शेतकऱ्यांनाच्या हक्काचा आहे. शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा यासाठी कारखाना तत्पर असेल.यावेळी कारखान्याचे संचालक, सुहास शिंदे, सरपंच, उपसरपंच व सर्व अधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होता.