बेरोजगार दिव्यांगांच्या विद्रोही आंदोलणाने नांदेड शहर दणानले

59

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2नोव्हेंबर) :- कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन राहुल सिताराम साळवे यांच्या नेतृत्वात आज दि २ नोव्हेंबर २०२० रोजी विद्रोही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनात जाहिर पाठिंब्यास्तव सहभाग संभाजी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड दिवयांग आघाडी नांदेड,भाजपा दिव्यांग आघाडी मुखेड/नांदेड/अर्धापुर,दिव्यांग, वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती.बिलोली.अर्धापुर.भोकर.ऊमरी.धर्माबाद.हिमायतनगर.नायगाव – नरसी.देगलुर.कंधार. माळाकोळी.लोहा.फेरोज खान दिव्यांग संघर्ष समिती हदगाव.मुकबधीर कर्णबधीर संघटणा नांदेड.ब्लाईंड संघर्ष समिती नांदेड यासह जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते.

या आंदोलणाची सुरूवात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तद्नंतर जिल्हा परिषद कार्यालयाकडे लेझीम/दांडिया आणि आक्रोश नारेबाजीच्या रूपात मोर्चा काढत दोन तास ठिय्या आंदोलन करत लेखी पत्र घेतल्या शिवाय गेट सोडण्यात आले नाही या लेखी पत्रात असे सांगण्यात आले कि.एका महिन्यात संबंधित सर्व जिल्हा परिषद कार्यालयाकडून दिव्यांगांचे प्रलंबित सर्व मागण्या निकाली काढण्यात येतील.

जो अधिकारी कर्तव्यात कसुर करेल त्यांच्यावर दिव्यांग सुधारीत कायदा २०१६ मधील कलम ८३ ते ९२ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल तदनंतर आक्रोश मोर्चेचे रूपांतर महानगरपालिका कार्यालयावर धडकला.यादरम्यान लंगर साहिब बंदाघाट कडुन शेकडो दिव्यांगांना लगर महाप्रसादाच्या माध्यमातून जेवण देण्यात आले त्यानंतर हे एकाच क्षनीचे विविध प्रकारचे विद्रोही आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर यांनी दिव्यांग शिष्टमंडळासह एकुण १९ मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करत १५ दिवसात संबंधित सर्व अधिकार्यांची बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.

दिव्यांग शिष्टमंडळाकडुन एका महिन्यात जर आमच्या मागण्या निकाली काढण्यात आल्या नाहीत तर येत्या जागतीक दिव्यांग दिनी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांचा ताबा घेत खुर्च्या जप्त करणार असल्याचे सांगण्यात आले.आजच्या या विद्रोही आंदोलनात बेरोजगार दिव्यांगाच्या प्रलंबित ५ टक्के अखर्चीत निधीसह दिव्यांग कायदा १९९५ आणि सुधारीत कायदा २०२६ ची अंमलबजावणी करणे.यासह रोजगारासाठी जागा.घरकुल.अंत्योदय शिधापत्रिका.थकित निराधार मानधन.अणुशेष भरती.मनरेगा अंतर्गत रोजगार.यासह ईतर मागण्या होत्या आजच्या या आंदोलनात राहुल साळवे.अमरदिप गोधने.प्रदिप गुब्रे.अब्दुल माजीद शेख चांद.देविदास बद्देवाड.संतोष पवार पाटिल.सुनील जाधव.चंपतराव डाकोरे.नागनाथ कामजळगे.शेषेराव वाघमारे.कार्तिक भरतीपुरम.भोजराज शिंदे शनीकर.गणेश वर्षेवार.विठ्ठल सुर्यवंशी.भाऊसाहेब टोकलवाड.बालाजी काकडे.रवि कोकरे.प्रदिप हणवते.राजकुमार देवकर.माधव शिरूरकर.गजानन इंगोले.राजु ईराबत्तीन.नागेश निरडी.सिद्धोधन गजभारे.प्रशांत हणमंते.विकास साळवे.प्रशांत कळसकर.हणमंतराव राऊत.शेख आरीफ.संदिप सातोरे.मुंजाजी कावळे.संजय धुलधाणी.अजय गोरे.दिलीप बेर्जे.तिवारी.शेख रफिक.विष्णु जायभाये.कमलबाई आखाडे.सविता गावटे.भाग्यश्री नागेश्वर.कल्पणा सप्ते यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव आणि भगीनी सहभागी झाले होते.