अखेर…कृषी अधीकारी पोहाचले शेतकऱ्यांच्या बांधावर

35

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क च्या बातमीची दखल

🔸बातमी प्रकाशित होताच कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड(दि.3नोव्हेंबर):-निकेश रामटेके यांनी नागभीड तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील धानपिकांची तात्काळ चौकशी व्हावी याकरिता कृषी अधिकाऱयांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष शेतकऱ्याकडे केंद्रीत केले. त्यानंतर पुरोगामी संदेश या पोर्टल चैनल नी बातमी प्रकाशित केली असता अवघ्या चार दिवसातच नागभिडचे कृषी अधिकारी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन धानपिकांची चौकशी सुरु केली.

शेतकरी बांधवाच्या हक्कासाठी आम्ही जो लढा उभारला तो मार्गी लावनारच. आनी आज तो मार्गी लागतांना दीसतोय. बहूजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे चिमुर विधानसभा अध्यक्ष निकेशभाऊ रामटेके यांनी स्वता शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेउन शेतमालाला लागलेला मावा तुळतुळा या रोगामुळे नष्ट झालेला उत्पन्न व त्या शेतकऱ्यांचा झालेले नुकसान हे विचारात घेउन सबंघीत अधीकाऱ्यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांचे दूख कळविले.

कमीत कमी त्याचे सर्वे तरी करा. आणी सबंधीत अधीकारी यांच्या मार्फतीने चौकशी करुन त्यांना योग्य तो मोबदला मीळवुन द्या. ही मागनी बहुजन रिपब्लिकन सोशालिष्ट पार्टीचे चिमूर विधानसभा अध्यक्ष निकेशभाऊ रामटेके यांनी नागभीड येथील कृषी अधिकाऱयांच्या दालनात रेटून धरली होती.

त्यामुळं आज २ ऑक्टोबर २०२० ला स्वता कृषी अधीकारी मिसाळ यांनी हूमा, खडकी, कीटाळी या शेतशीवारतील काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहानी केली. परीस्थीती खुपच गंभीर आहे हे त्यांनी सुद्धा मान्य केले. ही माहीती मी स्वतः सबंधीत अधीकाऱ्यांकडे पाठवतो. असे आश्वासन यावेळी दिले. त्यामुळं शेतकऱ्यांना दीलासा मिळाला.

शेतातील पाहानी करतांना कृषी अधीकारी मिसाळ, निकेशभाऊ रामटेके, मानीक कोडापे, राजेंद्र मडावी, भोलानाथजी मेश्राम, आकाश मडावी, हीवराज ठाकरे, गजानन पंधरे ईत्यादी शेतकरी उपस्थीत होते.