अमोल भालेराव यांना इंडियन नॅशनल आइकॉन अवार्ड जाहीर

86

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.3नोव्हेंबर):-येथील भुमिपुत्र अमोल पंचफुला निवृत्ती भालेराव यांना तेजोमया हेल्पिंग हॅंड ट्रस्ट,आंध्रप्रदेश कडून नुकताच इंडियन नॅशनल आइकॉन अवार्ड ऑनलाइनरित्या जाहिर केला आहे.पुसद तालुक्यातील कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केली आहे.

ग्रीन फाउंडेशन व रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातुन तसेच दुसर्याच्या मदतीने गरजूची त्यांनी मदत केली आहे.अश्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांना अनेक सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

अमोल भालेराव यांना सेवक सेवाभावी संस्था जळगाव कडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार, ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र कडून राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, राष्ट्रव्यापी अभियान कडून वर्ल्ड सोशल आयकॉन अवार्ड, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड कडून ओएमजी इनस्पिरियशन इंडियन सन्मान,बाल युवा नारी मंच कडून प्रतिभा सन्मान,कॉसमॉस वर्ल्ड रिकॉर्ड कडून सन्मानपत्र,शील्ड शेकुर सर्विस कडून विशिष्ट सेवा सन्मान, श्रीराम सोसायटी कडून कोरोना फाइटर आयकॉन अवार्ड, डायनामिक वर्ल्ड नेपाळ कडून सन्मानपत्र,शक्ति फ़िल्म प्रॉडक्शन कडून शक्ति योद्धा सन्मान,नारी फांउडेशन कडून विभा मुनि योगारत्न अवार्ड, राष्ट्रीय साप्ताहिक हिंदी समाचारपत्र ‘प्रवासी एकता’ कडून सच्चे सेवक सन्मान, ताईक्वान्डो स्पोर्ट्स असोसिएशन हरियाणा कडून शाहिद संम्मान स्मृर्ती अवार्ड,ग्रीन फांउडेशन कडून वनसंवर्धन रक्षक पुरस्कार,ईत्यादी पुरस्कार देऊन त्यांना गौरववण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे तेजोमया हेल्पिंग हॅंड ट्रस्ट संस्थापक, अध्यक्ष वादीकि प्रसाद यांनी नुकतीच त्यांना इंडियन नॅशनल आइकॉन अवार्ड २०२० पुरस्काराची घोषणा केली. अमोल भालेराव हे अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहेत.त्यांनी अनेक सामाजिक संघटनेमध्ये काम केले आहे.सध्या ते रयत सामाजिक प्रतिष्ठान व ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

समाजावारिल अन्याय अत्याच्याराविरुद्ध, विद्यार्थ्याचे प्रश्न, युवा बेरोजगार यांच्या समस्या,आत्महत्याग्रस्त शेतकरी, समाजिक समस्या, पर्यावरण अश्या अनेक सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो.या पुरस्कार निवडीबद्दल कुंटुब,मित्रपरिवार,सहकारी,सामिजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रशासकीय सेवक इत्यादिनी त्यांच्यावर अभिनदंनाचा वर्षाव केला आहे.

त्यांच्याशी संपर्क साधला बहुजनवादी महापुरुषाचा आदर्श समोर ठेऊन त्यांनी आपण समाजाचे काही देन लागत असल्यामुळे आणि ते आपले कर्तव्यच असल्याचे यापुढे सुद्धा प्रामाणीक हेतुने समाजसेवा करीत राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.यावेळी तेजोमया हेल्पिंग हॅंड ट्रस्ट आंध्रप्रदेश चे फाउंडर मादिकी प्रसाद यांचे त्यांनी पुरस्कार जाहिर केल्याबद्दल आभार मानले.