चांदवड पोलीसांनी चोरीच्या गुन्हयातील आरोपीतांस अटक करून १२.५० तोळे सोन्याची चैन केली प्राप्त

28

✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क )

निफाड(दि.8नोव्हेंबर):-चांदवड पोलीस स्टेशन हददीत दिनांक २४/१०/२०२० रोजी साय .०५ / ३० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.श्री एकनाथ रावजी खडसे साहेब , हे मुंबई येथुन जळगांवकडे जात असतांना चांदवड तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांनी श्री एकनाथ खडसे साहेबाना चांदवड चौफुली येथे थांबवुन त्यांचे स्वागत व सत्कार करीत असतांना श्री प्रसाद आबासाहेब देशमुख रा.लोणेर ता.देवळा जि . नाशिक यांचे गळयातील १२८ ग्रॅम वजनाची चैन रिलायंस ज्वेलरी कंपनीची सोन्याची चैन कोणीतरी अज्ञात चोरटयानी चोरली होती.

चांदवड पोलीस यांनी लागलीच सदर ठिकाणी जावुन खात्री करून पोलीस पथक मालेगांव बाजुकडे , चांदवड शहरात , नाशिक बाजुकडे तसेच मनमाडकडे जाणा – या रोडवर रवाना करून सदर ठिकाणाच्या काही लोकांनी सत्काराचे मोबाईल मध्ये व्हिडोओ सुर्टीग व फोटो काढलेले होते. सदर सुर्टीग व फोटो बारकाईनी निरीक्षण करता सदर व्हिडोओ सुर्टीग व फोटो मध्ये एक इसम वय अदाजे २२ ते २७ वर्षे वयोगटातील त्यांचे अंगात फुल बाहीचा आकाशी रंगाचा चौकटी नक्षीचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेले हा चैन काढतांना दिसुन आला.

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक मा.श्री सचिन पाटील , मालेगांव विभागाचे अपर पोलीस अधिक्षक मा.श्री चंद्रकांत खांडवी , अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण विभाग मा.श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभागाचे मा.श्री समिरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील ज राजपुत व स्टॉप यांनी सदरचे फोटो व फुटेज प्राप्त करून सदरचे फोटो व फुटेज हे सोशल मिडीयाव्दारे पाठवुन वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची ओळख पटवुन तांत्रीक विश्लेषनच्या सहयाने वरीष्ठाच्या परवानगी घेवुन बीड येथे पो.हवा . नरेंद्र सौदाणे , पो.कॉ . अमित सानप असे तपास पथक रवाना केले.

सदर आरोपीतांचे वेळोवेळी लोकेशन घेवुन त्याप्रमाणे तपास पथक यांना स्थानिक पोलीस यांचे मदतीने शोध घेता आरोपी नामे प्रविण विजय गायकवाड रा.गांधीनगर , बीड येथे मिळुन आल्याने त्यांस ताब्यात घेवुन त्यांचे अंगझडतीत सोन्याची १२७.२३ ग्रॅम वजनाची चैन रिलायंस ज्वेलरी कंपनीची जुनी वापरती किमंत ७,५६,००० : 00 रुपये किमंतीची सोन्याची चैन मिळुन आल्याने सदर चैन बाबत विचारपुस करता त्यांनी सदरची चैन चांदवड शहरात चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीतांस चांदवड पोलीस स्टेशन येथे आण्यात येवुन आरोपी प्रविण विजय गायकवाड रा.गांधीनगर , बीड यांस दिनांक ०७/११/२०२० रोजी मा . व्यायदंडाधिकारी सो.प्रथम वर्ग चांदवड यांचे कोर्टात हजर करता मा.हा न्यायालयाचे सदर आरोपीतांची ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

तरी सदर अटक आरोपी यांचे सोबत इतर काही साथीदाराची टोळी असण्याची शक्यता असल्याने पोलिसांतर्फे वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.