विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे वाचनालयासाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी

55

🔸सुदामभाऊ राठोड यांचा पुढाकार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

जिवती(दि.7नोव्हेंबर):- तालुक्यातील आसापुर ग्रामपंचायती मध्ये येणाऱ्या चारही गावांना आसापुर , पेद्दाआसापुर, लींगणडोह, गडपांढरवनी या चारही गावांना पंचवीस हजार रुपयांची तरतूद निवेदनात करण्यात आली. हे चारही गाव अतिदुर्गम भागातील असल्यामुळे येणाऱ्या भाविपिडीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वाचनालय निर्मित करणे गरजेचे आहे.

जवळ पास सगळीकडे आता मुल- मुली सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करीत आहेत. जसे पोलिस भरती , काही इतर प्रशासकीय भरती चा अभ्यास करीत आहेत अश्या वेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनालय निर्मित करून द्यावे असे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे सुदामभाऊ राठोड यांचा पुढाकाराने सहकार्यकर्त्या सोबत ग्रामसेवक यांना देण्यात आला.