आनलाईन बतूकम्मा सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

26

🔸प्रथम क्रमांक वनिता चंद्रय्या तोकला तर व द्वितीय क्रमांक कविता सत्यम पिडगू

✒️विजय तोकला(सिरोंचा प्रतिनिधी)मो:-9403477377

सिरोंचा(दि.9नोव्हेंबर):- माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब तसेच माजी जिल्ह्यापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) विजयांचे शिल्पकार रा.यू. कांग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराजजी हलगेकर यांचा मार्गदर्शनाखाली व चांगले विचारांचे कार्य म्हणून यंदा राष्ट्रवादी महिला कांग्रेस तथा राष्ट्रवादी युवती कांग्रेस गडचिरोलीच्या वतीने भव्य आनलाईन बतूकम्मा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

यात महिलांनि सुंदर दिसत असे बतूकम्मा तयार करून आनलाईन पद्धतीने दिलेल्या फोन नंबरवर पाटविण्यात आले.यात पीठासीन महिलांनी त्यातून प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक निवडण्यात आले.यास सिरोंचा तालुक्यातुन रहिवासी सिरोंचा प्रथम क्रमांक वनिता चंद्रय्या तोकला व टेकडा/बोरमपल्ली येथील रहिवासी द्वितीय क्रमांक कविता सत्यम पिडगू यांची निवड करण्यात आले.

या आदर्श महिलांना मानसन्मानाने बक्षीस व प्रमाणपत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका महिला अध्यक्ष सौ.मनीषा रवी चल्लावार, सुप्रिया पुद्दठवार रा.युवती महिला तालुका अध्यक्ष, सपना गोडशलवार हसीना पोठ्ठला रा.का.महिला शहर अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देण्यात आले.व अभिनंदनाचा वर्षाव केले.