यंदाच्या हिवाळी अधिवेशनामुळे दरवर्षी होत असलेल्या खर्चातुन शिल्लक रहात असलेल्या निधीतुन बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्य करा

30

🔸राहुल साळवे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.12नोव्हेंबर):- कोरोना या महामारीचा संसर्ग आज नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण देशात झपाट्याने वाढत आहे तसेच शेकडोजन मृत्युमुखी पडत आहेत परंतु या लाॅकडाऊन काळात कुठलीच उपाय योजना तसेच भरीव मदत हि बेरोजगार दिव्यांगांसाठी राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी न केल्यामुळे याचा फटका हा सर्वाधिक बेरोजगार दिव्यांगांना बसला आहे कारण हातावरचे पोट आणि दिव्यांगांसाठी लढणारे दैवत मोठमोठाले शेठ” यामुळे बेरोजगार दिव्यांगांची परिस्थिती ईकडे आड आणि तिकडे विहिर अशीच झाली आहे परंतु न्याय हक्क आजवर मिळालाच नाही.

कारण आजवर दिव्यागांगांच्या न्याय हक्कासाठी लढणारे – डोळ्याला पट्टी बांधून तसेच गळ्यात हात अडकुन आणि लंगडत लंगडत आलेले आज सरपंच.नगरसेवक.आमदार.खासदार यासह मोठ मोठि मंत्रीपद भुषविले परंतु या सर्वांनी दिव्यांगांचा केवळ वापर केला परीणामी आज बेरोजगार दिव्यांग हा शासनाच्या विविध योजनांपासून वंचीतच आहे आणि जोवर बेरोजगार दिव्यांगांंना स्वताचे राजकिय आरक्षण मिळणार नाही तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यासह दिल्लीच्या धर्तीवर जोवर दिव्यांगांना निराधार मानधनात वाढ होणार नाही.

यासाठि हा संघर्षमय लढा चालूच राहणार आहे असे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड चे संस्थापक अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.या प्रसिद्धी पत्रकात राहुल साळवे यांच्यासह आनंदा माने.नागनाथ कामजळगे.प्रदिप गुब्रे.अमरदिप गोधने आणि अब्दुल माजीद शेख चांद यांच्या स्वाक्षर्या आहेत.