खाजगी रुग्णालयामध्ये नॉनकोविड रुग्णांवर प्राथमिक उपचार करा – नागरिकांची मागणी

    34

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हापुरी(दि.12नोव्हेंबर):- संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याकारणाने बर्‍याच संकटाना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.यातच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आजारानुसार वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असते. मात्र खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार होत नाही. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. म्हणूनच ब्रह्मपुरी येथील समस्त नागरिकांच्या वतीने खाजगी रुग्णालयात नागरिकांच्या आजारावर प्राथमिक उपचार व्हावा यासाठी नागरिकांच्या वतीने नाम. विजय भाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर तसेच उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे.

    ब्रम्हपुरी शैक्षणिक व आरोग्य नागरी म्हणून ओळखली जाते .परंतु कोविड -१९ मध्ये ब्रम्हपुरी खाजगी रुग्णालयांत नॉन कोविड रुग्णांनवर प्राथमिक उपचार येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर उपचार करण्यास तयार नसून अनेक रुग्णांना आपल्या वेदना सहन करून उपचारासाठी दिवस व रात्री धडपड करीत असतात, पण खाजगी रुग्णालयातील डॉक्टर कोणताही उपचार न करता कोविड १९ टेस्ट करावयास लावतात. सर्व प्रथम प्राथमिक उपचाराची गरज असतांना खाजगी रुग्णालयातील डॉक्टर उपचार करन्यास असमर्थता दाखवितात.

    अनेक रुग्णांनी अश्या यांच्या बे-जबाबदार वागणुकी मुळे अनेक रुग्णांना जिव गमवावा लागला आहे. अश्यातच ब्रम्हपुरी शहरातील नागरिक उपचारासाठी डॉक्टरांकडे विनवणी करतांना दिसत आहे. खाजगी रुग्णालयात नॉन कोविंड रुग्णाला हात लावण्यास खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तयार होत नाहीत, ब्रम्हपुरी नगरीतील सर्व खाजीगी रुग्णालयातील डॉक्टर व शासकीय डॉक्टरांनी तालुक्यातील कोणत्याही रुग्णांना केव्हाही तपासणी करावी अन्यथा ब्रह्मपुरी येथील नागरिक या व्यवस्थेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतांना दीपक उराडे, मंगु छाबडा राजन अग्रवाल,नंदू गुड्डेवार,गोवर्धन दोनाडकर,मनोज कावळे, अमर गाडगे, प्रशांत डांगे तसेच मोठ्या संख्येने ब्रहापुरी नागरिक उपस्थित होते.