पदवीधर बेरोजगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या बारा वर्षांपासून सतत क्रियाशील – आ.सतिष चव्हाण

76

🔹परळीत सहविचार सभेला पदवीधरांचा प्रचंड प्रतिसाद

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.12नोव्हेंबर):-ना.धनंजय मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून आपण राजकीय क्षेत्रात काम करत आहोत. परळी व बीड जिल्ह्यातील मतदार यांचे माझ्यावर आणि माझे तुमच्यावर नितांत प्रेम आहे याची मला पुर्णतः जाणीव आहे. पदवीधर बेरोजगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या बारा वर्षांपासून आपण निष्ठेने सतत क्रियाशील आहोत. वेळ प्रसंगी आंदोलन व संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. पदवीधर मतदार यांनी संपुर्ण शक्ती आजपर्यंत माझ्या पाठीशी उभी केली त्या शक्तीवर पुढेही अविरतपणे कार्यरत राहू अशी ग्वाही पदवीधर आ.सतिष चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. संजय दौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा व पदवीधर मेळाव्याचे आज बुधवारी (दि. ११) आयोजन करण्यात आले होते. सतीश चव्हाण यांनी आज पदवीधर मतदार, शिक्षक, अभियंते यांच्याशी परळीत थेट संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे या उपस्थित होत्या. सतीश चव्हाण यांनी तालुक्यातील पदवीधर मतदार, शिक्षक, अभियंते, बेरोजगार यांच्याशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी केलेल्या मागील बारा वर्षातील कामांचा आढावा घेतला. यामध्ये सहा हजार शाळांना संगणक वाटप केले. ६ कोटी रु. निधी ग्रंथालयांच्या पुस्तकांसाठी दिला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७०/३० च्या फार्म्युल्यासाठी विधानमंडळात लक्षवेधी सूचना मांडून वारंवार आंदोलने करून त्या लढ्यास यश मिळवून दिले. यासह अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा उल्लेख केला. तसेच केंद्रातील भाजप सरकार विद्यार्थी धोरणाच्या विरोधात असल्याने त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे असे त्यांनी सांगितले. ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर व सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगून पदवीधर मतदार यांनी संपुर्ण शक्ती आजपर्यंत माझ्या पाठीशी उभी केली त्या शक्तीवर पुढेही अविरतपणे कार्यरत राहू अशी ग्वाही पदवीधर आ.सतिष चव्हाण यांनी दिली.

यावेळी आमदार संजय दौंड यांनी सांगितले की, मराठवाड्यातील पदवीधर मतदार सुज्ञ आहेतच योग्य उमेदवार सतिष चव्हाणच असुन त्यांच्या विक्रमी मतांच्या विजयाचा इतिहास यावेळी तयार करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी करतांना आ.सतिष चव्हाण यांचा यावेळी विजयाचा विक्रम करुन दाखवू असा निर्धार व्यक्त केला.आ. चव्हाण यांची ही तिसरी निवडणूक असून, त्यांच्या विजयी हॅट्ट्रिक मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. सुत्रसंचलन गोविंद केंद्रे यांनी केले.

यावेळी आमदार संजय दौंड, नगराध्यक्ष सरोजनीताई हालगे, पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गीते ,राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेशाध्यक्ष हारे पाटील ,मुक्टा संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, पंचायत समितीचे उपसभापती पिंटू मुंडे ,जिल्हा परिषदेचे सदस्य प्रा. मधुकर आघाव, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. अनील मुंडे, शहराध्यक्ष बाबू नंबरदार ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, सिनेट मेंबर पी.एल. कराड, प्राचार्य मुंजाभाऊ धोंडगे, युवकांचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष सय्यद सिराज, ज्येष्ठ नेते माधव ताटे,के.डी. उपाडे, महिला आघाडीच्या संगीता तुपपसागर, ओबीसी सेलचे अध्यक्ष राजकुमार डाके, सांस्कृतीक आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत जोगदंड, माणिक फड ,दत्ता भाऊ सावंत , नगरसेवक चंदुलाल बियाणी, जाबीर खान पठाण, आयुब पठाण, विजय भोईटे , अनिल अष्टेकर ,शंकर आडेपवार, राजेंद्र सोनी ,चेतन सौंदळे, ज्येष्ठ नेते जानिमिया कुरेशी, वैजनाथ सोळंके , प्रा.विनोद जगतकर, अनिल जाधव ,प्रा.शाम दासुद, महेंद्र रोडे, लाला खान पठाण, शंकर कापसे, रवी मुळे, यांच्यासह संस्थाचालक बहादुर भाई, शरद राडकर, अनिल जाधव, नवाब पटेल, साहेबराव फड, उल्हास पवार, डॉक्टर विश्वास देशमुख, राजेसाहेब निर्मळ, अजय सोळंके, साहेबराव चव्हाण,डी जी शिंदे, सुनील चव्हाण,नारायण वानखेडे, श्रीनिवास देशमुख, अमोल कांबळे,लक्ष्मण वाकडे, राहुल ताटे,श्रीकांत माने,नागेश सुगरे, फरकुंद अली बेग यांच्यासह अनेक पदवीधर मतदार, शिक्षक, अभियंते, बेरोजगार अभियंते, यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते  व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.