गंगाबाई तलमले महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

    34

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.12नोव्हेंबर):-भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून स्थानिक गंगाबाई महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. महान स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला प्रा. डॉ. राकेश तलमले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. ख्यातनाम शिक्षणतज्ञ मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जीवन कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला.

    प्रा.डॉ. राकेश तलमले म्हणाले की, मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यानंतरचेही योगदान महत्वपूर्ण आहे. प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे व ते भावी पिढीला नवी दिशा देणारे आहे.

    कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित होते.या प्रसंगी प्रा. डॉ. राकेश तलमले, प्राचार्य मंगेश देवढगले, इंजिनियर लीलाधर बांगरे, प्रा. कुमोद राऊत, प्रा. जयगोपाल चोले, डोंगरवार सर, अनिल प्रधान, उमेश राऊत, कनक ठोंबरे आदी उपस्थित होते उपस्थित होते.