प्रभारी गटशिक्षण अधिका-याची आठवड्याला वारी

54

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.12नोव्हेंबर):-येथील गटसाधन केंद्र अलीकडे वेगवेगळ्या समशाने ग्रासलेले आहे. गटशिक्षण अधिकारी , विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदि अधिका-यांच्या रिक्त पदामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आॕक्सिजनवर असून त्यामुळे शाळामधील कमी होत असलेली पटसंख्यामुळे ० ते १० पटसंख्येच्या शाळेवर बंदची टांगती तलवार असून तालुक्यास प्रभारी राजमुळे गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.

एकंदरीत गटसाधन केंद्राचा शिक्षण विभाग आॕक्सिजनवर असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा आहे.बिलोली येथिल गटशिक्षण अधिकारी (वर्ग-२) हे पद गेल्या जानेवारी२०२० या महिन्यापासून पद रिक्त असून प्रभारी म्हणून देगलूर येथील विस्तारअधिकारी असलेले हमीद दौलताबादी यांना प्रभारी म्हणून बिलोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ते बिलोली च्या कार्यालयाला आठवड्यातून एक एकदा येतात. कारण कि ते पुर्णवेळ देगलूर येथे कार्यरत असल्याने बिलोलीच्या कार्यालयाला जास्त वेळ देत नाही अशी चर्चा आहे.

गटशिक्षण अधिकारी तर प्रभारी आहेच त्या खालोखाल गटसाधन केंद्रा अंतर्गत बिलोली, कुंडलवाडी, कासराळी बिट असे तिन विस्तार अधिकारी पद आहेत.या तिन बिट पैकी कासराळी विस्तार अधिकारी पद पुर्णवेळ तर बिलोली चा अतिरिक्त पदभार भैरवाड मॕडम यांच्याकडे देण्यात आला. बिलोलीचा विस्तारअधिकारी पद जवळपास दोन वर्षापासून रिक्त आहे.

कुंडलवाडीचा विस्तार अधिकारी चा अतिरिक्त पदभार कौटकर यांच्याकडे देण्यात आला. हे पद जवळजवळ तिन ते चार वर्षापासून रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समजली आहे.सध्या कौटकर व भैरवाड मॕडम यांच्याकडेच तिन बिट चा पदभार देण्यात आले असल्याची माहिती आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापनाच्या अशा एकुण १६३ शाळा आहेत. त्याकरिता बिलोली, कुंडलवाडी, कासराळी, किनाळा, दुगाव, तळणी, केसराळी, अटकळी, हुनगुंदा अशे नऊ केंद्र आहेत.या नऊ केंद्रासाठी सध्या तिनकेंद्रप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये दुगाव केंद्राचे लोलमवाड यांच्याकडे दुगाव पुर्णवेळ तर बिलोली व कासराळी केंद्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.कुंडलवाडी केंद्राचे कौटकर यांच्याकडे कुंडलवाडी पुर्णवेळ तर तळणी व हुनगुंदा केंद्राची अतिरिक्त जबाबदारी आहे.

किनाळा केंद्राचे येसके यांच्याकडे किनाळा पुर्णवेळ तर अटकळी व केसराळी केंद्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने माहिती मिळाली आहे. बिलोली केंद्र सध्या एक केंद्रप्रमुख पुर्णवेळ कार्यरत आहेत,तर दोन ठिकाणी जागा रिक्त आहेत.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदाचे ग्रहण असल्याने गुणवत्ता पुर्ण सर्वांगीण शिक्षण, अध्यापन, अध्ययन, विकास कसा साध्य होईल हा खरा संशोधनाचा विषय आहे.

शिक्षण क्षेञातील एवढा सारा आलबेलपणा असताना येथील पंचायत सामिती सभापती,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती, जिल्ह्यातिल प्राथमिक व माध्यमिक शिक्षणअधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन पुर्णवेळ गटशिक्षणअधिकारी, विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख यांची पदे भरण्याची मागणी येथील शिक्षण प्रेमी करित आहे.